Pune Mumbai Expressway: आता २ तास आधीच पुण्याहून नवी मुंबई विमानतळावर पोहोचणार, ‘या’ रस्ताचं काम ९० टक्के पूर्ण
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Pune Mumbai Expressway: आता २ तास आधीच पुण्याहून नवी मुंबई विमानतळावर पोहोचणार, ‘या’ रस्ताचं काम ९० टक्के पूर्ण

Pune Mumbai Expressway: आता २ तास आधीच पुण्याहून नवी मुंबई विमानतळावर पोहोचणार, ‘या’ रस्ताचं काम ९० टक्के पूर्ण

Jan 07, 2025 10:56 AM IST

Pune Mumbai Expressway Link Road: पुणे- मुंबई द्रुतगती महामार्गावरील लिंक रोडचे काम जवळपास ९० टक्के पूर्ण झाले आहे. या रस्त्यामुळे प्रवासी आता दोन तास आधीच नवी मुंबई विमानतळावर पोहोचतील.

पुणे- मुंबई द्रुतगती महामार्गावरील लिंक रोडचे काम ९० टक्के पूर्ण
पुणे- मुंबई द्रुतगती महामार्गावरील लिंक रोडचे काम ९० टक्के पूर्ण

Pune to Navi Mumbai Travel Time: पुणे ते मुंबई असा प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. पुणे- मुंबई द्रुतगती महामार्गावरील लिंक रोडचे काम जवळपास ९० टक्के पूर्ण झाले असून आता पुण्याहून मुंबई गाठण्यासाठी लागणाऱ्या वेळत अर्ध्या तासाचे अंतर कमी होणार आहे. एवढेच नव्हेतर, या रस्त्यामुळे प्रवासी दोन तास आधीच पुण्याहून मुंबई विमानतळावर पोहोचतील. पुणे- मुंबई द्रुतगती महामार्गावरील लिंक रोडमुळे प्रवाशांचा भरपूर वेळ वाचणार आहे.

पुणे ते मुंबई हे अंतर साधारणपणे १६० किलोमीटर आहे आणि पुणे ते नवी मुंबई विमानतळातील अंतर १२० किलोमीटर आहे. पुण्याहून मुंबईला पोहोचण्यासाठी अंदाजे ४ तासांचा वेळ लागतो. पण पुणे- मुंबई द्रुतगती महामार्गावरील लिंक रोडमुळे पुण्याहून मुंबईला पोहण्यासाठी साडे तीन तास लागतील. तर, पुण्याहून नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळापर्यंत जाण्याचा वेळ २ तासांपर्यंत कमी होणार आहे.

लिंक रोडचे काम ९० टक्के पूर्ण

लोणावळ्याजवळील लिंक रोडचे काम जवळपास ९० टक्के पूर्ण झाले आहे. वेगाने काम पूर्ण केले जात असून हा प्रकल्प पूर्ण करण्याची डेडलाईन जूनमध्ये आहे. लिंक रोडमध्ये दोन बोगदे आणि दोन पुलांचा समावेश आहे.त्यामुळे घाईगडबडीत आम्हाला कोणतीही जोखीम पत्करायची नाही', अशी माहिती एमएसआरडीसीचे कार्यकारी अभियंते राकेश सोनावणे यांनी दिली. पुणे- मुंबई द्रुतगती महामार्गावरील लिंक रोडमुळे पुणे-मुंबई द्रुतगती मार्गाचं अंतर ६.५ किलोमीटरनं कमी होईल. हा लिंकरोड १३.३ किलोमीटर लांब आहे. यापैकी ८.९ किलोमीटरचा भाग डोंगरांमधून जातो. तर, १.७ किलोमीटरचा बोगदा आहे. याशिवाय या मार्गात अनुक्रमे ८४० मीटर आणि ६५० मीटरचे दोन केबल ब्रिज आहेत.

प्रकल्पासाठी एकूण ६ हजार ५९५ कोटी खर्च

लोणावळा घाट विभागातील तीव्र उतार आणि तीक्ष्ण वळणे काढून टाकणे आणि खोपोली ते कुसगावपर्यंतचा टप्पा शून्य अपघात क्षेत्र करण्याचा मानस या प्रकल्पाच्या माध्यमातून पूर्ण करण्याचा प्रयत्न असेल. हा प्रकल्प २०२२ मध्येच पूर्ण होणे अपेक्षित होते. परंतु, कोरोना माहामारीमुळे काम रखडले. आता जून २०२५ पर्यंत काम पूर्ण होईल, असे प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे. दोन दशकांपूर्वी बांधण्यात आलेल्या पुणे- मुंबई द्रुतगतीवर गेल्या काही वर्षांमध्ये वाहतुकीत सातत्याने वाढ होत आहे. लोणावळा घाट विभागातील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी आणि प्रवासाचा वाढता वेळ कमी करण्यासाठी लिंक रोडचे काम सुरू करण्यात आले. या प्रकल्पाची एकूण किंमत ६ हजार ५९५ कोटी आहे.

Whats_app_banner

संबंधित बातम्या

विभाग
महाराष्ट्रातील बातम्या, प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर