Pune murder : कामावरून काढल्याच्या रागातून कामगाराचा खून; पुण्यातील वाघोलीतील धक्कादायक घटना
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Pune murder : कामावरून काढल्याच्या रागातून कामगाराचा खून; पुण्यातील वाघोलीतील धक्कादायक घटना

Pune murder : कामावरून काढल्याच्या रागातून कामगाराचा खून; पुण्यातील वाघोलीतील धक्कादायक घटना

Aug 23, 2023 11:00 AM IST

Pune murder : पुण्यात कामावरून काढून टाकल्याने एकाने दारूच्या नशेत एकाचा धार धार शस्त्राने खून केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.

Pune murder
Pune murder

पुणे : कामावरून काढून टाकल्याने दारु पिताना झालेल्या वादातून एका कामगार तरुणावर तीक्ष्ण शस्त्राने वार करुन त्याचा खून केल्याची धक्कादायक घटना नगर रस्त्यावरील वाघोली परिसरात घडली.

शैलेश मांडगीकर असे खून झालेल्या कामगाराचे नाव आहे आहे. याप्रकरणी राम सुभाष श्रीराम (वय २५, रा. बेरळी बुद्रुक, मुखेड, जि. नांदेड), गोपाल ज्ञानोबा कोटालापुरे (वय २५, रा. नांदेड नाका, महादेवनगर जि. लातूर) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Pune snake bite : पुणे जिल्ह्यात सर्पदंशाचे प्रमाण घटले तर शहरात वाढले; वर्षभरात केवळ ४३० घटनांची नोंद

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार संगम चंद्रशेखर धारिया (वय २३, रा. सिधावट खास, कुशीनगर, उत्तरप्रदेश) याने या संदर्भात लोणीकंद पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. कोटलापूरे, धारिया, श्रीराम, मांडगीकर कामगार आहेत. श्रीराम, कोटालापुरे, मांडगीकर बुधवारी रात्री वाघोली-केसनंद रस्त्यावरील सिट्रोन सोसायटीसमोर दारु पित होते. ठेकेदाराने मांडगीकरला श्रीरामच्या सांगण्यावरुन कामावरुन काढल्याने त्यांच्यात वाद झाला झाला होता. दरम्यान, मांडगीकरने श्रीराम आणि कोटलापुरे यांना दारुच्या नशेत शिवीगाळ केली. याचा राग आल्याने त्यानंतर आरोपींनी मांडगीकर याच्यावर तीक्ष्ण शस्त्राने वार करुन त्याचा खून केला. यानंतर आरोपी फरार झाला आहे. पोलिसांनी त्याच्या शोध घेण्यासाठी पथके स्थापन केली असून आराेपींचा शोध घेण्यात येत आहे. या प्रकरणी सहायक पोलीस निरीक्षक एम. के. पाटील तपास करत आहेत.

पुण्यात गेल्या काही दिवसांपासूंन गुन्हेगारीच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. किरकोळ कारणावरून एकमेकांच्या जिवावर उठणाऱ्यांची संख्या वाढली आहे. त्यात कोयता गॅंगचा देखील हैदोस शहरात सुरू आहे. यांच्यावर कारवाई करण्याची मागणी नागरिक करत आहे.

Whats_app_banner

संबंधित बातम्या

विभाग
महाराष्ट्रातील बातम्या, प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर