Daund Crime: पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यातील बोरीबेल गावात धक्कादायक घटना घडली. पत्नीशी अनैतिक संबंध ठेवत असल्याच्या संशयातून सासऱ्याने जावयाला सुनावले. मात्र, यामुळे राग अनावर झाल्याने जावयाने सासऱ्याची चाकू भोसकून हत्या केली. या प्रकरणी जावयाविरोधात दौंड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी पुढील चौकशीला सुरूवात केली. मात्र, या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ माजली.
मिळालेल्या माहितीनुसार, लकझऱ्या कोब्या काळे असे आरोपी जावायाचे नाव असून तो पुण्यातील इंदापूर तालुक्यातील लासुर्ने येथील रहिवाशी आहे. तर, सुदाम हिऱ्या चव्हाण असे हत्या झालेल्या व्यक्तीचे नाव आहे, जो बोरीबेल येथे वास्तव्यास होता. लकझऱ्या हा बोरीबेल येथे सासरवाडीत गेले असता मयत सुदाम यांनी त्याला शिवीगाळ केली. तू माझ्या पत्नीशी अनैतिक संबंध ठेवतो, असे बोलत सुदाम यांनी लकझऱ्याशी वाद घालायला सुरुवात केली. यानंतर लकझऱ्याने आपल्या सोबत आणलेल्या धारदार चाकू सुदामच्या छातीत जोरात खुपसला. या घटनेत सुदाम गंभीर जखमी झाला.
नातेवाईकांनी सुदाम यांना बेशुद्ध अवस्थेत दुचाकीवर बसवून दौंड येथील शासकीय रुग्णालयात घेऊन गेले, तिथे डॉक्टरांनी सुदाम चव्हाण यांना तपासून मृत घोषित केले. सदर घटनेबाबत दौंड पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. या घटनेनंतर आरोपी फरार झाला असून त्याचा पोलीस शोध घेत आहेत. या घटनेने परिसरात एकच खळबळ माजली.
दक्षिण दिल्लीतील संगम विहार भागात रविवारी दुपारी एका २४ वर्षीय तरुणाची चाकूने भोसकून हत्या करण्यात आली. या व्यक्तीला चाकूने अनेक जखमा झाल्या असून त्यात त्याचा मृत्यू झाला असून त्यानंतर संगम विहार पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पवन कुमार ऊर्फ लकी या पीडितेची हत्या सूडबुद्धीने करण्यात आल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले आहे. लकीने २०१५ मध्ये संगम विहार परिसरात शिवम नावाच्या व्यक्तीची हत्या केली होती. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी झालेल्या खून प्रकरणात चारपैकी दोन संशयित शिवमचे भाऊ आहेत.
एका वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याने नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले की, सनी (नाव बदलले आहे) या संशयिताला ताब्यात घेण्यात आले असून त्याची चौकशी केली जात आहे.पोलीस उपायुक्त अंकित चौहान यांनी सांगितले की, रविवारी सायंकाळी साडेचारच्या सुमारास संगम विहार पोलिस स्टेशनला के-१ संगम विहार येथे चाकूहल्ला झाल्याची माहिती मिळाली. पोलिसांचे पथक घटनास्थळी पोहोचले असता पीडित मुलगी चाकूच्या अनेक जखमांसह बेशुद्धावस्थेत आढळली. पथकाने त्याला तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल केले, जिथे त्याला मृत घोषित करण्यात आले.