Pune PMC Job : जर तुम्ही इंजिनियर असाल तर पुणे महानगर पालिकेत कनिष्ठ अभियंत्यांसाठी नोकरीच्या संधी उपलब्ध आहेत. पालिकेने तब्बल ११३ ज्युनिअर इंजिनिरची पदे भरण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. या पदासाठी मिळणारा पगारही आकर्षक आहे. जर या भरती प्रक्रियेत सहभाग घ्यायचा असेल तर लवकरात लवकर अर्ज करण्याचे आवाहन महानगर पालिकेतर्फे करण्यात आले आहे.
पुणे महानगरपालिका राज्यातील मोठे बजेट असलेल्या महानगर पालिकांपैकी एक आहे. या महानगर पालिकेत तब्बल ११३ ज्युनिअर इंजिनिर भरले जाणार आहे. पालिकेच्या स्थापत्य विभागाकडून ही भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे. या भरती प्रक्रियेसाठी शिक्षणाची ही अट ठेवण्यात आली असून अर्जदाराचे शिक्षण इंजीनियरिंग मधून झालेले असावे. दरम्यान, अर्ज करणाऱ्या उमेदवाराने गेल्या वर्षी झालेल्या भरतीमध्ये तीन वर्षाचा अनुभव घेतला असणे ही अट होती. मात्र, यंदाच्या भरतीमध्ये ही अट काढून टाकण्यात आली आहे. त्यामुळे शिक्षण पूर्ण झालेले अभियंते सुद्धा या मेघा भरतीमध्ये अर्ज करू शकणार आहे. ११३ जागा पैकी १३ जागा या माजी सैनिकांसाठी आरक्षित करण्यात आल्या आहेत तर राहिलेल्या १०० जागा या प्रवर्गातील उमेदवारांसाठी ठेवण्यात आल्या आहेत.
१६ जानेवारी पासून इच्छुकांना या पदासाठी अर्ज करता उएणार आहे. गेल्या वर्षी देखील १३५ जूनियर इंजिनियर्स साठी ही भरती प्रक्रिया महानगरपालिकेने राबवली होती. त्यासाठी प्रत्येक उमेदवाराला तीन वर्ष अनुभवाची अट ठेवण्यात आली होती. तब्बल १२ हजार ५०० जणांनी या साठी अर्ज दाखल केला होता. मात्र, या वर्षी अनुभवाची कोणतीही अट ठेवण्यात आलेली नाही.
सरकारी जॉब मिळवण्याची ही सुवर्ण संधि असून पात्र उमेदवारांनी तातडीने या संधीचा लाभ घ्यावा असे आवाहन देखील करण्यात आले आहे.