Pune Municipal Corporation Warns Private Hospital: खाजगी रुग्णालयात उपचार घेणाऱ्या नागरिकांची लूटमार थांबविण्यासाठी पुणे महानगरपालिकेने महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. पुण्यातील खाजगी रुग्णालयाला दर्शनी भागात दरपत्रक लावणे बंधनकारक करण्यात आले. पुणे महानगरपालिकेचा आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या दोषी रुग्णालयाविरोधात कडक कारवाई केली जाईल. रुग्ण किंवा त्यांचे नातेवाईक खाजगी रुग्णालयासंबंधित तक्रार नोंदवण्यासाठी पुणे महानगरपालिकेने जारी केलेल्य टोल फ्री क्रमांकावर संपर्क करू शकतात.
पुण्यात खाजगी रुग्णालयात रुग्णांकडून उपचारासाठी आवाजवी फी आकरली जाते. याच पार्श्वभूमीवर पुणे महानगरपालिका क्षेत्रातील खाजगी रुग्णालयात दरपत्रक लावण्याचे आदेश देण्यात आले आहेत. तसेच खाजगी रुग्णालयात उपचार घेण्यासाठी आलेल्या रुग्णांना दिसेल अशा ठिकाणी पुणे महानगरपालिका तक्रार निवारण कक्षाचा हेल्पलाइन क्रमांक लावणे बंधनकारण असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. हा क्रमांक सोमवार ते शुक्रवार कार्यालयीन वेळेत सुरू असेल. खाजगी रुग्णालयात होणारी आर्थिक लूटमार थांबविण्यासाठी नागरिकांनी १८००२३३४१५१ या अधिकृत टोल फ्री क्रमांकावर फोन करून आपली तक्रार नोंदवावी, असे आवाहन करण्यात आले.
पुणे महानगरपालिकेने घेतलेल्या निर्णयाला डॉक्टरांच्या एका संघटनेने विरोध दर्शवला आहे. तसेच पुणे महानगरपालिका तक्रार निवारण कक्षाचा हेल्पलाइन क्रमांक रुग्णालयात लावू नयेत, अशा बेकायदेशीर सूचना त्यांनी दिल्या आहेत. त्याचबरोबरोबर संघटनेचा वापर करून ते पालिका प्रशासनावर दबाव टाकत आहेत. त्यामुळे तक्रार निवारण यंत्रणा कार्यान्वित झाली तरी पुणेकरंपर्यंत त्याची माहिती पोहचू शकलेली नाही.
खाजगी रुग्णालयासंबंधित कोणतीही तक्रार असल्यास रुग्ण किंवा त्यांचे नातेवाईक टोल फ्री क्रमांकावर फोन करू शकतात. तसेच प्रत्येक व्यक्तीने हा टोल फ्री क्रमांक आपल्या मोबाईलमध्ये सेव्ह केला पाहिजे, असेही पुणे महापालिकेकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
संबंधित बातम्या