मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Pune Mumbai Expressway : मुंबई-पुणे एक्सप्रेस वे वरून प्रवास करणं आता आणखी महागणार, टोलच्या दरात वाढ

Pune Mumbai Expressway : मुंबई-पुणे एक्सप्रेस वे वरून प्रवास करणं आता आणखी महागणार, टोलच्या दरात वाढ

Shrikant Ashok Londhe HT Marathi
Sep 15, 2022 08:40 PM IST

मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे'चा प्रवास आणखी महाग होण्याची शक्यता आहे.एमएसआरडीसी कडून मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील टोलच्या दरांमध्येमोठी वाढ केली जाणार आहे.

टोलच्या दरात वाढ
टोलच्या दरात वाढ

Pune Mumbai expressway toll rate : पुढच्या वर्षीपासून मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे' चा प्रवास आणखी महाग होण्याची शक्यता आहे. एमएसआरडीसी कडून मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील टोलच्या दरांमध्ये मोठी वाढ केली जाणार आहे. १ एप्रिल २०२३ पासून एक्सप्रेस वे वरील टोलच्या दरात (toll rates) तब्बल १८ टक्क्यांनी वाढ केली जाणार आहे.

एक्सप्रेस वे (Pune Mumbai expressway) वरून मुंबई-पुणे हे अंतर तीन ते चार तासात पार केले जाते. त्यामुळे अनेकजण मुंबई-पुणे नेहमीच रस्त्याने अप-डाऊन करतात. अनेकजण दर शनिवार-रविवारी मुंबईहून विकेंड सेलिब्रेट करण्यासाठी पुण्याला जातात. अशा प्रवाशांना याचा फटका बसण्याची शक्यता आहे. कारण त्यांना भविष्यात टोलसाठी जास्त पैसे मोजावे लागण्याची शक्यता आहे.

पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावरील टोलमध्ये याआधी १ एप्रिल २०२० रोजी अशीच वाढ झाली होती. २०३० पर्यंत प्रत्येक तीन वर्षाला ही दरवाढ करण्याचा करार झाला आहे.

२००४ साली सार्वजनिक बांधकाम विभागाकडून मुंबई-पुणे द्रुतगती मार्गाच्या टोलमध्ये दर तीन वर्षांनी १८ टक्के वाढ करण्याची अधिसूचना काढण्यात आली होती. त्यानुसार, २०२३मध्ये टोलच्या दरात वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याआधी १ एप्रिल २०२० मध्ये अशीच वाढ झाली होती. मात्र १ एप्रिल २०२३ ला लागू होणारे टोलचे दर हे २०३० पर्यंत कायम असतील, असं एमएसआरडीसीकडून सांगण्यात आलं. म्हणजे २०२६ मध्ये टोलचे दर वाढवले जाणार नाहीत.

IPL_Entry_Point

संबंधित बातम्या

विभाग