Pune Cat Home : पुणे तेथे काय उणे अशी म्हण प्रचलित आहे. अशीच एक घटना समोर आली आहे. पुण्यातील हडपसर भागात ही घटना घडली आहे. हडपसर येथील एका सोसायटीत राहणाऱ्या एका महिलेने एक दोन नव्हे तर तब्बल ३०० हून अधिक मांजर पाळले आहेत. या मांजरी आता सोसायटीची डोकेदुखी ठरली आहे. या प्रकरणी संबंधित महिलेला वारंवार सूचना करून देखील ती ऐकत नसल्याने आता सोसायटी धारकांनी थेट पुणे पोलिस आणि महानगर पालिकेकडे कारवाईसाठी तक्रार केली आहे.
हडपसर येथील मार्व्हल बाउंटी कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटीतील हा प्रकार असून सोसायटीतील ३ बीएचके फ्लॅटमध्ये एक महिला ही तब्बल ३०० मांजरांसह एकटी राहत आहे. याबाबत इमारतीतील रहिवाशांनी या महिलेला समज देण्याचा प्रयत्न केला. मात्र, ही महिला ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हती. गेल्या ४ वर्षांपासून सोसायटीतील इतर फ्लॅट धारक याचा त्रास सहन करत आहेत. या महिलेच्या फ्लॅटच्या जवळपास प्रचंड दुर्गंधी येत आहेत. तसेच फ्लॅटमधून मांजरींच्या ओरडण्याचे व भांडण्याचे आवाज येत असल्याने नागरिक त्रास झाले आहेत. या फ्लॅटमध्ये सुरुवातीला ५० ते ६० महिला होत्या. गेल्या ४ वर्षात या महिलेकडे ३०० मांजरी झाल्या आहेत.
या मांजरीचा सोसायटी धारकांना त्रास होत असल्याने अखेर त्रस्त झालेल्या सोसायटीतील रहिवाशांनी एकत्र येत पुणे महानगर पालिका, पोलीस प्रशासनाशी संपर्क करीत याबाबत तक्रार केली आहे. त्यानंतर प्रशासनाने यावर कारवाई केली असून या महिलेच्या घरातून तब्बल 300 मांजरी असल्याचं आढळलं आहे. रिंकू भारद्वाज असे या महिलेचे नाव असून तिला पालिकेने व पोलिसांनी पुढील ४८ तासात मांजरींची विल्हेवाट लावण्यासाठी नोटिस दिली आहे. जर या आदेशाचे पालन केले नाही तर सर्व मांजरींना प्राणी आश्रयस्थळी हलवले जाईल, असे देखील नोटीसीमध्ये म्हटले आहे.
संबंधित बातम्या