Vasant More news : वसंत मोरे यांचा मनसेला जय महाराष्ट्र; राज ठाकरेंच्या फोटोला दंडवत घालत दिला राजीनामा
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Vasant More news : वसंत मोरे यांचा मनसेला जय महाराष्ट्र; राज ठाकरेंच्या फोटोला दंडवत घालत दिला राजीनामा

Vasant More news : वसंत मोरे यांचा मनसेला जय महाराष्ट्र; राज ठाकरेंच्या फोटोला दंडवत घालत दिला राजीनामा

Mar 12, 2024 02:24 PM IST

Vasant More Quits MNS : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रदेश सरचिटणीस वसंत मोरे यांनी अखेर पक्षाचा राजीनामा दिला आहे. मोरे यांनी प्राथमिक सदस्य आणि इतर सर्व पदाचा राजीनामा दिला आहे. गेल्या काही दिवसांपासून ते नाराज होते.

वसंत मोरेंचा मनसेला जय महाराष्ट्र
वसंत मोरेंचा मनसेला जय महाराष्ट्र

Vasant More Resignation : पुण्यातील मनसेचे फायरब्रँड नेते वसंत मोरे यांनी पक्षाला अखेर ‘जय महाराष्ट्र’ केला आहे. त्यांनी राज ठाकरे यांच्या फोटो पुढे साक्षात दंडवत घालत पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा व सर्व पदाचा राजीनामा दिला आहे. सोशल मीडियावर पोस्ट करत त्यांनी स्वत: ही माहिती दिली आहे. निवडणुकीच्या तोंडावर राज ठाकरे यांना हा मोठा धक्का मानला जात आहे.

वसंत मोरे हे पक्षातील काही वरिष्ठांवर नाराज होते. त्यांनी अनेकदा ही नाराजी व्यक्तही केली होती. त्यांनी आज सकाळीच 'एका मर्यादेच्या बाहेर त्रास सहन केल्यानंतर माणूस खूप शांत होतो. त्यानंतर ना कोणाकडे तक्रार करतो ना कोणाकडून अपेक्षा ठेवतो', अशा आशयाची पोस्ट केली होती. त्यानंतर काही तासातच त्यांनी मनसेचा राजीनामा दिला आहे. दरम्यान, ते काही दिवसांपूर्वी शरद पवार यांना भेटले होते. त्यामुळे आता ते शरद पवार यांना साथ देतील काय या कडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Manoharlal khattar resign : हरयाणाच्या राजकारणाला कलाटणी; मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांचा राजीनामा

वसंत मोर यांनी दिलेल्या राजीनाम्यात म्हटले आहे की, प्रति,

मा. श्री राजसाहेब ठाकरे, संस्थापक अध्यक्ष, महाराष्ट्र नवनिर्माण सेना

विषयः माझा पक्षाच्या प्राथमिक सदस्य आणि सर्व पदांचा राजीनामा स्वीकारणे संदर्भात.

आपणास सप्रेम जय महाराष्ट्र।

पक्षाच्या स्थापनेपासून (किंबहुना त्याही आधीपासून) पक्षाचा सदस्य आणि इतर पदावर काम करत असताना आपण दिलेल्या जबाबदाऱ्या आणि आदेश यांचे पालन करण्याचा मी माझ्या परीने प्रयत्न करत आलो आहे. पक्ष संघटना वाढीसाठी गेली १८ वर्ष सातल्याने काम करत असताना पुणे शहरात आणि सरचिटणीस म्हणून महाराष्ट्रात कार्यरत राहिलो. परंतु अलीकडच्या काळात पुणे शहरातील वरिष्ठ पदाधिकाऱ्यांकडून माझ्या विरोधात होत असलेले पक्षांतर्गत गलिच्छ राजकारण व पक्षाप्रति असलेल्या माझ्या निष्ठेवर उपस्थित होत असलेले प्रश्नचिन्ह माझ्यासाठी अत्यंत वेदनादायी आहे.

भविष्यात पक्षाचे लोकप्रतिनिधी निवडून यावेत, यासाठी मी स्थानिक पदाधिका-यांना सामावून घेऊन मदत व उपक्रम देतो, त्याना ताकद देतो त्या सहकान्यांची शहरातील वरिष्ठ पदाधिकाऱ्याकडून कोडी करण्याचे 'तर अवलंबिले जात आहे. म्हणून मी आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या प्राथमिक सदस्यत्वासह सर्व पदांचा राजीनामा देत आहे. कृपया आपण तो स्वीकारावा ही नम विनंती.

 

Whats_app_banner
महाराष्ट्रातील बातम्या, प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर