Pune Mhada Lottery : पुण्यात स्वस्तात घर खरेदीची संधी! म्हाडाची ६,२९४ घरांची सोडत जाहीर; असा करा अर्ज
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Pune Mhada Lottery : पुण्यात स्वस्तात घर खरेदीची संधी! म्हाडाची ६,२९४ घरांची सोडत जाहीर; असा करा अर्ज

Pune Mhada Lottery : पुण्यात स्वस्तात घर खरेदीची संधी! म्हाडाची ६,२९४ घरांची सोडत जाहीर; असा करा अर्ज

Oct 11, 2024 09:00 AM IST

pune mhada lottery : पुण्यात घर घेण्याचे सर्वसामान्यांचे स्वप्न पूर्ण होणार आहे. म्हाडाच्या पुणे मंडळाच्या क्षेत्रातील ६,२९४ घरांच्या सोडत जाहीर झाली असून अर्ज विक्री-स्वीकृती सुरुवात झाली आहे.

पुण्यात बजेटमध्ये घर करण्याची संधी! म्हाडाची तब्बल ६,२९४ घरांची सोडत जाहीर; असा करा अर्ज
पुण्यात बजेटमध्ये घर करण्याची संधी! म्हाडाची तब्बल ६,२९४ घरांची सोडत जाहीर; असा करा अर्ज

pune mhada lottery : पुण्यात बजेटमध्ये घर घेण्याचे स्वप्न आता लवकरच पूर्ण होणार आहे. म्हाडाच्या पुणे मंडळाच्या ६,२९४ घरांची सोडत जाहिर झाली असून या साठी अर्ज विक्री-स्वीकृतीला गुरुवार पासून सुरुवात झाली आहे. या सोडतीत पुणे, पिंपरी-चिंचवड, पीएमआरडीए, सोलापूर, कोल्हापूर व सांगलीतील घरांचा समावेश आहे, अशी माहिती पुणे मंडळाचे सभापती शिवाजीराव आढळराव पाटील यांनी दिली. त्यांच्या हस्ते गुरूवारी ही सोडत जाहीर करण्यात आली आहे. अर्ज विक्री-स्वीकृती प्रक्रिया, सोडतपूर्व प्रक्रिया ३० नोव्हेंबरपर्यंत सुरू राहणार असून ५ डिसेंबर रोजी या सोडतीचा निकाल जाहीर करण्यात येणार आहे.

पुणे म्हाडाची या वर्षीची ही तिसरी सोडत आहे. या पूर्वी दोन सोडत जाहीर करण्यात आल्या होत्या. यात अनेकांना घरे मिळाली होती. पुणे मंडळ क्षेत्रातील ६,२९४ घरांची सोडत गुरुवारी जाहीर करण्यात आली. या साठी अर्ज विक्री-स्वीकृतीला देखील सुरुवात करण्यात आली आहे. अर्जदारांनी अनामत रक्कम भरून अर्ज करता येणार आहे. या सोडतीसाठी १२ नोव्हेंबरपर्यंत ऑनलाइन पद्धतीने अर्ज करता येणार आहे. बँकेच्या कार्यालयीन वेळेत आरटीजीएस किंवा एनईएफटीद्वारे अनामत रकम भरून १३ नोव्हेंबर रोजी दुपारी ३ वाजेपर्यंत अर्ज भरता येणार आहे. त्यानंतर अर्जांची छाननी सुरू होईल व त्यानंतर २३ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ७ वाजता म्हाडाच्या https://housing.mhada.gov.in या संकेतस्थळावर पात्र अर्जांची प्रारूप यादी प्रसिद्ध होणार आहे. या वर ३० नोव्हेंबर पर्यंत हरकती नोंदवता येणार आहे व यानंतर पात्र अर्जदारांची अंतिम यादी प्रसिद्ध होईल. तर ५ डिसेंबर रोजी सोडतीचा निकाल जाहीर केला जाणार आहे.

पाच भागात विभागणी

पुणे मंडळाची ही सोडत पाच भागांमध्ये विभागण्यात आली आहे. यात म्हाडा गृहनिर्माण योजनेतील ‘प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य’ योजनेअंतर्गत २,३४० सदनिका विक्रीसाठी सोडतीत उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. तर म्हाडा गृहनिर्माण योजनेअंतर्गत ९३ सदनिका व पंतप्रधान आवास योजनेतील ४१८ सदनिका ‘प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य’ तत्वावर उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. 

तर २० टक्के सर्वसमावेशक गृहनिर्माण योजनेअंतर्गत पुणे महानगरपालिका, चिंचवड महानगरपालिका, पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण हद्दीतील एकूण ३,३१२ सदनिकांचा समावेश आहे. तर १५ टक्के सामाजिक गृहनिर्माण योजनेतील १३१ सदनिकांचा समावेश सोडतीत करण्यात आला आहे.

Whats_app_banner

संबंधित बातम्या

विभाग
महाराष्ट्रातील बातम्या, प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर