मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Pune Mhada Lottery: पुण्यात घर घेण्याचे स्वप्न साकार होणार; म्हाडाच्या ५,२११ घरांची सोडत निघाली!

Pune Mhada Lottery: पुण्यात घर घेण्याचे स्वप्न साकार होणार; म्हाडाच्या ५,२११ घरांची सोडत निघाली!

Ninad Vijayrao Deshmukh HT Marathi
Aug 18, 2022 01:32 PM IST

Pune Mhada Lottery: पुणे मंडळ म्हाडाच्या ५२११ घरांच्या ऑनलाईन सोडतीचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते दूरदृश्य प्रणालीद्वारे काढण्यात आली.

पुण्यात म्हाडाच्या घरांच्या सोडतीचे उद्घाटन करताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
पुण्यात म्हाडाच्या घरांच्या सोडतीचे उद्घाटन करताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

Pune Mhada Lottery: पुण्यात घर घेण्याचे सांमन्यांचे स्वप्न आज पूर्ण होणार आहे. आज पुण्यातील जिल्हा परिषदेच्या सभागृहात सकाळी १० वाजता या सोडतीला ऑनलाइन पद्धतीने सुरुवात झाली. या वर्षीची ही दुसरी सर्वात मोठी लॉटरी आहे. जवळपास ५ हजार २११ घरे आज सामान्यांना मिळणार आहे, अशी माहीती म्हाडाचे प्रमुख अधिकारी नितीन माने यांनी हिंदुस्थान टाईम्स मराठीला दिली. 

पुणे मंडळ म्हाडाच्या ५२११ घरांच्या ऑनलाईन सोडतीचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते दूरदृश्य प्रणालीद्वारे काढण्यात आली आहे. विधानभवनातील समिती सभागृहात आयोजित कार्यक्रमास गृहनिर्माण विभागाचे प्रधान सचिव मिलिंद म्हैसकर, म्हाडाचे उपाध्यक्ष अनिल डिग्गीकर, नगरविकास विभागाच्या प्रधान सचिव सोनिया सेठी आदी मान्यवर उपस्थित आहेत.

पुणे, पिंपरी-चिंचवडसह सोलापूर व कोल्हापूर जिल्ह्यातील ५२११ घरांसाठी म्हाडा ही सोडत काढत आहे. पुणे मंडळामार्फत म्हाडाच्या विविध योजनतौल २७८ सदनिका, प्रथम येणा-यास प्रथम प्राधान्य तत्त्वावर असलेल्या म्हाडाच्या २८४५ सदनिका आणि २० टक्के सर्वसमावेशक गृहनिर्माण योजनेंतर्गत २०८८ सदनिका अशा एकूण ५२११ सदनिकांच्या संगणकीय सोडतीचा आज शुभारंभ झाला.

म्हाडा तर्फे या वर्षी काढण्यात आलेली ही सर्वात मोठी सोडत आहे. यावर्षी म्हाडाने तीन मोठ्या सोडती काढलेल्या आहेत. यात २० टक्के आणि थेट बांधकाम व्यवसायिकांनी बांधलेल्या घरांचा समावेश आहे. ही सोडत ऑनलाइन लॉटरी पद्धतीने काढण्यात येणार आहे. https://www.youtube.com/watch?v=G2-x4T4QUOU या संकेत स्थळावर याचे थेट प्रक्षेपण होणार आहे.

 दरम्यान उद्घाटन करताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले,  सर्वसामान्यांचे घराचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी बांधकामाच्या दरात म्हाडा घरे उपलब्ध करुन देत असून म्हाडा आणि सिडकोच्या माध्यमातून पोलीस निवासस्थाने तसेच सर्वसामान्यांना परवडणारी हक्काची घरे देण्यासाठी शासन कटिबद्ध आहे.  पुणे म्हाडा मंडळाच्या ५ हजार २११ सदनिकांसाठी सुमारे ९० हजारांपेक्षा अधिक नागरिकांनी अर्ज केले आणि ७१ हजारांपेक्षा अधिक अर्जदारांनी अनामत रक्कम भरुन यात सहभाग नोंदविला, हे शासन आणि म्हाडाची विश्वासार्हता वाढीला लागल्याचे उत्तम उदाहरण आहे. आज सोडत काढण्यात आलेल्या सदनिकांपैकी तीन हजार घरे ही तयार असून पुढील दीड महिन्यात त्यांचे वाटप केले जाईल तर उर्वरित सदनिकांचे काम एक-दीड वर्षात पूर्ण करुन त्यांचे वाटप करण्यात येणार असल्याचेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

स्वतःचे घर हे प्रत्येक नागरिकाचे स्वप्न आहे, हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी सर्वांसाठी परवडणाऱ्या किंमतीत घरांची संकल्पना मांडली आणि प्रधानमंत्री आवास योजनांसारख्या विविध योजनांमधून हक्काची घरे उपलब्ध करुन दिली जात आहेत असे सांगून हे सर्वसामान्यांचे सरकार असून प्रत्येकाच्या मनात सरकारबद्दल असणारा विश्वास अधिक वृद्धिंगत करण्यासाठी यंत्रणांनी जोमाने काम करण्याच्या सूचनाही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिल्या.

IPL_Entry_Point

विभाग