मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Pune Mhada Lottery : पुण्यात म्हाडाची बंपर लॉटरी! ४,७७७ घरांसाठी सोडत जाहीर, असा करा अर्ज?

Pune Mhada Lottery : पुण्यात म्हाडाची बंपर लॉटरी! ४,७७७ घरांसाठी सोडत जाहीर, असा करा अर्ज?

Ninad Vijayrao Deshmukh HT Marathi
Mar 09, 2024 09:17 AM IST

Pune Mhada Lottery : पुण्यात घर घेण्याचे सर्व सामान्य नागरिकांचे स्वप्न पूर्ण होणार आहे. पुणे आणि पिंपरी-चिंचवडमधील (Pimpri Chinchwad) अनुक्रमे ४७५ व ५६१ घरांसाठी म्हाडाने सोडत जाहीर केली आहे.

पुण्यात म्हाडाची बंपर लॉटरी! ४ हजार ७७७ घरांसाठी सोडत जाहीर
पुण्यात म्हाडाची बंपर लॉटरी! ४ हजार ७७७ घरांसाठी सोडत जाहीर

Pune Mhada Lottery : पुण्यात घर घेण्याचे सर्व सामान्य नागरिकांचे स्वप्न पूर्ण होणार आहे. म्हाडाने पुणे आणि पिंपरी-चिंचवडमधील ४७५ आणि ५६१ घरांसाठी सोडत जाहीर केली आहे. या सोडतीत विविध उत्पन्न गटातील पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर आणि सोलापूर या पाच जिल्ह्यांमधील तब्बल ४ हजार ७७७ घरांसाठी ही सोडत जाहीर करण्यात आली आहे. या सोडतीसाठी शुक्रवार पासून अर्ज करण्यास सुरुवात झाली आहे.

nirav modi : तुरुंगात असलेल्या नीरव मोदीला लंडन कोर्टाचा दणका! ६६ कोटी भरण्याचे आदेश; दुबईतील कंपनीचा होणार लिलाव

म्हाडा पुणे मंडळाचे सभापती शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या उपस्थितीत म्हाडा कार्यालयात या सोडतीचा प्रारंभ झाला. शुक्रवारी ३ पासून म्हाडाचा अर्ज भरायला सुरुवात झाली आहे. या सोडतीसाठी ऑनलाइनपद्धतीने अर्ज नोंदणीची मुदत ही ८ एप्रिल सायंकाळी पाच वाजेपर्यंत राहणार आहे. तर सोडतीसाठी ऑनलाइन अर्ज सादर करण्याची मुदत १० एप्रिल रात्री १२ पर्यंत राहणार आहे.

Samruddhi Mahamarg Accident : समृद्धी महामार्गावर भीषण अपघात! रासपच्या जिल्हाध्यक्षांसह दोघे ठार; संभाजी नगर जवळील घटना

या अर्जाचे ऑनलाइन शुल्क भरण्याची मुदत १२ एप्रिलपर्यंत आहे. म्हाडाचा या सोडतीसाठी अर्ज भरण्यासाठी अर्जदारांना https://mhada.gov.in या संकेतस्थळास भेट द्यावी लागणार आहे. या सोडतीत ‘प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य’ तत्त्वावरील योजनांच्या सदनिकांसाठी देखील उपलब्ध असून या साठी lottery.mhada.gov.in या संकतेस्थळावर नोंदणी करावी लागणार आहे.

अशी आहे घरांची यादी

- प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य – २४१६ घरे

– म्हाडाच्या विविध योजना – १८

– म्हाडा पंतप्रधान आवास (पीएमएवाय) योजना ५९

– पंतप्रधान आवास (पीएमएवाय) खासगी भागीदारी योजना (पीपीपी) – ९७८

– २० टक्के योजना पुणे महापालिका ७४५ आणि पिंपरी-चिंचवड ५६१

एकूण ४ हजार ७७७ सदनिका

 

IPL_Entry_Point