Pune metro : पुणे मेट्रो आता रामवाडी ते वाघोली आणि वनाज ते चांदणी चौकपर्यंत धावणार
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Pune metro : पुणे मेट्रो आता रामवाडी ते वाघोली आणि वनाज ते चांदणी चौकपर्यंत धावणार

Pune metro : पुणे मेट्रो आता रामवाडी ते वाघोली आणि वनाज ते चांदणी चौकपर्यंत धावणार

Published Mar 11, 2024 08:45 PM IST

Pune Metro News : पुणेकरांची अनेक दिवसांपासून मागणी असणारी रामवाडी ते वाघोली व वनाज ते चांदणी चौक या विस्तारीत मेट्रो मार्गाला राज्य मंत्रीमंडळाने मंजूरी दिली.

पुणे मेट्रो चांदणी चौकापर्यंत धावणार
पुणे मेट्रो चांदणी चौकापर्यंत धावणार

पुणेकरांसाठी आनंदाची बातमी आहे.  पुणेकरांची अनेक दिवसांपासून मागणी असणारी रामवाडी ते वाघोली व वनाज ते चांदणी चौक या विस्तारीत मेट्रो मार्गाला राज्य मंत्रीमंडळाने मंजूरी दिली. सोमवारी पार पडलेल्या मंत्रिमंडळ बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. मंत्रिमंडळाने मंजूर केलेले दोन्ही प्रस्ताव अंतिम मंजुरीसाठी केंद्र सरकाकडे पाठवले जाणार आहे. 

रेल्वे मंत्रालय त्यानंतर अर्थ मंत्रालयाची मंजुरी मिळाल्यानंतर केंद्रीय मंत्रिमंडळ त्यावर शिक्कामोर्तब करेल. मात्र लोकसभा निवडणूक आचारसंहिता लागण्याची शक्यता असल्याने मंजुरीला विलंब होण्याची शक्यता आहे. 

वाघोली व चांदणी चौकपर्यंत विस्तारीत मेरो मार्गाचा हा प्रस्ताव महापालिकेने महामेट्रोच्या माध्यमातून राज्य सरकारकडे पाठवला होता. वनाज ते रामवाडी या मार्गाचे काम सुरू झाल्यानंतर लगेचच ही मागणी करण्यात आली होती. रामवाडी ते वाघोली हे अंतर साडेअकरा किलोमीटर आहे. त्यावर ११ स्थानके आहेत. वनाज ते चांदणी चौक दरम्यान २ स्थानके आहेत. वनाज ते रामवाडी या मेट्रो मार्गाचे काम आता पूर्ण झाले आहे. मंत्रिमंडळाच्या मंजुरीनंतर आता चांदणी चौकातून थेट वाघोलीत मेट्रोने जाणे सोपे होणार आहे.

राज्य सरकारच्या मंजुरीनंतर रेल्वे मंत्रालयाकडून या प्रस्तावाची छाननी केली जाईल. त्यात दुरुस्त्या केल्यानंतर अर्थ मंत्रालयात प्रस्तावाचा एकूण खर्च, त्याचे नियोजन, त्याची विभागणी याविषयी चर्च होऊन नंतर केंद्रीय मंत्रीमंडळाची अंतीम मजूरी मिळेल.

Whats_app_banner

संबंधित बातम्या

विभाग
महाराष्ट्रातील बातम्या, प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर