Pune Metro News : पुणे मेट्रोची कामे जोरदार सुरू आहे. मेट्रोच्या सिव्हिल कोर्ट ते स्वारगेट मार्गाचे काम पूर्ण झाले आहे. असून येथील अंडरग्राउंड चाचणी दोन महिन्यांपूर्वी घेण्यात आली. पुणे मेट्रोला आणखी ३ कोच देखील मिळणार असल्याने लोकसभा निवडणूक निकालानंतर हे मार्ग सुरू होण्याची शक्यता आहे. सध्या मेट्रोचे दोन मार्ग सुरु करण्यात आले असून नागरिक मेट्रो प्रवासाला प्रतिसाद देत आहे. हा प्रतिसाद पाहता मेट्रोने आता पुणेकरांसाठी नवी योजना आणली आहे. या अंतर्गत पुणे मेट्रोने दैनंदिन पासची सुविधा सुरू केली असून १०० रुपयांच्या या पासने दिवसभरात मेट्रोच्या दोन्ही मार्गांवर अमर्यादीत प्रवास करता येणार आहे. त्यामुळे पुण्यातून पिंपरी चिंचवड आणि पिंपरी चिंचवडमधून पुण्यात येणाऱ्या प्रवाशांची सुविधा होणार आहे.
पुणेकर मेट्रोने प्रवास करण्यास प्राधान्य देत आहेत. रोज हजारो पुणेकर मेट्रोसेवेचा लाभ घेत आहेत. पुणे मेट्रो सिव्हिल कोर्ट ते पिंपरी चिंचवड आणि वनाज ते रामवाडी या मार्गांवर सध्या धावत आहेत. पुणेकरांकडून मिळणाऱ्या प्रतिसादामुळे मेट्रो प्रशासनही नवनवीन सुविधा देण्याचा प्रयत्न करत आहेत.
गेल्या मार्च महिन्यात तब्बल २२ लाखांपेक्षा जास्त पुणेकरांनी मेट्रोने प्रवास केला. पिंपरी- चिंचवडमधून पुणे स्टेशन, येरवडा, वनाजपर्यंत मेट्रोने जात येते. मेट्रोने केवळ अर्धा तासांत हा प्रवास होत असल्याने रस्ते मार्गाने जाण्यापेक्षा मेट्रोने जाण्यास नागरिक प्राधान्य देत आहेत. मेट्रोकडून ऑनलाइन आणि ऑफलाइन तिकीट सुविधा, अॅप, मेट्रो स्थानकावर मशीनच्या माध्यमातून तिकीट दिले जात आहे.
स्मार्ट कार्ड, मासिक पास मेट्रोकडून प्रवाशांना दिला जात आहे. आता त्यासोबत प्रवाशांना शंभर रुपयांना दैनंदिन पासची सुविधा पुणे मेट्रोने सुरु केली आहे. त्यामध्ये त्या दिवसभरात अमर्यादीत प्रवास करता येणार आहे. यामुळे प्रवाशांचा फायदा होणार आहे. हा पास दोन्ही मार्गांवर वापरता येणार आहे. तसेच पासची वैधात ही सकाळी सहापासून रात्री दहा वाजेपर्यंत राहणार आहे.
सध्या पुणे मेट्रोच्या सिव्हिल कोर्ट ते स्वारगेट मार्गाचे काम पूर्ण झाले आहे. या ठिकाणी अंडरग्राउंड मेट्रोची चाचणी दोन महिन्यांपूर्वी घेण्यात आली. यामुळे लोकसभा निवडणूक निकालानंतर कधीही हा मार्ग महामेट्रोकडून सुरु केला जाण्याची शक्यता आहे.
संबंधित बातम्या