मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Pune Metro : मेट्रो स्थानकापर्यंत पोहोचण्यासाठी ‘शेअर ए रिक्षा’; १८ स्थानकांपासून १०७ मार्ग निश्चित; दरही ठरले

Pune Metro : मेट्रो स्थानकापर्यंत पोहोचण्यासाठी ‘शेअर ए रिक्षा’; १८ स्थानकांपासून १०७ मार्ग निश्चित; दरही ठरले

Ninad Vijayrao Deshmukh HT Marathi
Aug 10, 2023 09:20 AM IST

Pune News: पुण्यात मेट्रोचे जाळे विस्तारत आहे. त्यामुळे या मेट्रो मार्गापर्यंत पोहचण्यासाठी शेअर रिक्षाची नवी योजना आणण्यात आली आहे. प्रवाशांच्या सोईसाठी आरटीओने मार्ग निश्चित केले असून दर देखील निश्चित करण्यात आले आहेत.

Pune Metro Project
Pune Metro Project (HT_PRINT)

पुणे : पुण्यात मेट्रोचे जाळे विस्तारत आहेत. सध्या मेट्रोचे१८ स्थानके हे सुरू करण्यात आले आहे. दरम्यान, पुणेकरांना या स्थानका पर्यंत पोहचता यावे यासाठी पुणे प्रादेशिक परिवहन विभागाने तब्बल १०७ मार्ग निश्चित केले असून या मार्गावर शेअर रिक्षा चालवल्या जाणार आहेत. याचे दर देखील निक्षित करण्यात आले असून यामुळे पुणेकरांना लवकरच स्थानकापर्यंत पोहचून मेट्रो सेवेचा लाभ घेता येणार आहे.

Russia Luna 25 Mission : तब्बल ४७ वर्षांनी रशियापाठवणार चंद्रावर यांन; 'लुना २५' यान आज अवकाशात झेपवणार

पुण्यात सार्वजनिक वाहतूक वेगवान करण्यासाठी मेट्रो उभारण्यात येत आहे. या मेट्रोचे अनेक मार्ग पूर्ण झाले आहेत. त्यामुळे मेट्रो स्थानकापासून प्रवाशांना लवकर प्रवासी सेवा मिळावी, यासाठी मेट्रो स्थानक व पुणे रेल्वे स्टेशन येथून शेअर रिक्षा सुरू करण्याचे आदेश होते. त्यानुसार पुणे आरटीओ’ने १८ मेट्रो स्थानके आणि पुणे रेल्वे स्टेशनपासून शेअर रिक्षाचे मार्ग निश्चित केले असून याची सुरवात देखील करण्यात आली आहे. मेट्रो स्थानकाजवळ जागेनुसार किती रिक्षा उभ्या असाव्यात, त्या ठिकाणाहून किती मार्गांवर शेअर रिक्षा असावी, तसेच त्याचे प्रति व्यक्ती दर किती असावे हे देखील आरटीओने ठरवून दिले आहे. ११ ते कमाल ४२ रुपयांपर्यंत हे दर राहणार आहे.

Pune Daund news : विद्यार्थी शाळा सोडून गेल्याने पुण्यात शिक्षकानं उचललं टोकाच पाऊल; संपवलं स्वतःचं आयुष्य

या संदर्भात माहिती देतांना उपप्रादेशीक परिवहन अधिकारी संजीव भोर म्हणाले, शहरातील १८ मेट्रो स्टेशनबरोबरच पुणे रेल्वे स्टेशन येथून शेअर रिक्षा सुरू करण्यात आली आहे. ही सेवा १०७ मार्गावर कार्यान्वित करण्यात येणार असून पुणे रेल्वे स्टेशनपासून पुलगेट, वाडिया कॉलेज, संचेती हॉस्पिटल अशा मार्गांवर शेअर रिक्षा सुरू करण्यास परवानगी दिली आहे. त्यासाठी दरदेखील निश्चित करण्यात आले आहेत. नागरिक शेअर रिक्षासह मीटरनेही प्रवास करू शकणार आहेत.

सिव्हिल कोर्ट ते फडके हौद/ कमला नेहरू रुग्णालय, जे. एम. कॉर्नर/ मॉडर्न शाळा, नळस्टॉप ते दीनानाथ मंगेशकर रुग्णालय, महात्मा सोसायटी, कर्वे पुतळा, रुबी हॉल, जीपीओ, पुणे महापालिका, लक्ष्मी रोड, पोलिस आयुक्त कार्यालय, नाशिक फाटा (भोसरी) ते एमआयडीसी कॉर्नर, पीसीएमसी ते साई चौक, रुबी हॉल ते एसजीएस मॉल, गरवारे कॉलेज ते टिळक रोड/ सदाशिव पेठ, नळस्टॉप ते सिम्बायोसिस कॉलेज, दापोडी ते जुनी सांगवी, नाशिक फाटा ते पिंपळे गुरव, पुणे रेल्वे स्टेशन ते एमएसईबी (रास्ता पेठ), शिवाजीनगर ते ज्ञानेश्वर पादुका चौक, पीसीएमसी ते केएसबी चौक, दापोडी ते नवी सांगवी, शिवाजीनगर ते दीपबंगला चौक या मार्गावर ही सेवा असणार आहे.

WhatsApp channel

विभाग