पुण्यातील मावळ तालुक्यात बैलगाडा मालकाची गळा आवळून हत्या; खंडणीसाठी खून झाल्याचा रचला बनाव
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  पुण्यातील मावळ तालुक्यात बैलगाडा मालकाची गळा आवळून हत्या; खंडणीसाठी खून झाल्याचा रचला बनाव

पुण्यातील मावळ तालुक्यात बैलगाडा मालकाची गळा आवळून हत्या; खंडणीसाठी खून झाल्याचा रचला बनाव

Nov 22, 2024 09:47 AM IST

Pune Maval Murder : पुण्यातील मावळ तालुक्यात एका प्रसिद्ध बैलगाडा मालकाचा खून करण्यात आला आहे. यानंतर पुरावा नष्ट करण्यासाठी त्याचा मृतदेह जळून टाकला.

पुण्यातील मावळ तालुक्यात बैलगाडा मालकाची गळा आवळून हत्या; खंडणीसाठी खून झाल्याचा रचला बनाव
पुण्यातील मावळ तालुक्यात बैलगाडा मालकाची गळा आवळून हत्या; खंडणीसाठी खून झाल्याचा रचला बनाव

Pune Maval Bailgada malak Murder : पुण्यातील मावळ तालुक्यात खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. येथील प्रसिद्ध बैलगाडा मालकाची दोरीच्या साह्याने गळा आवळून हत्या करण्यात आली आहे. यानंतर आरोपींनी पुरावा नष्ट करण्याच्या हेतूने मृतदेह जाळून टाकत खंडणीच्या वादातून हा खून झाल्याचा बनाव रचला. पिंपरी-चिंचवड गुन्हे शाखेच्या खंडणीविरोधी आणि औद्योगिक तक्रारी निवारण पथकाने तपास करून हे प्रकरण उघडकीस आणलं आहे. आरोपीला अटक करण्यात आली आहे.

पंडित रामचंद्र जाधव (वय ५२, रा. जाधववाडी डॅमजवळ, नवलाख उंबरे, ता. मावळ) असे खून झालेल्या गाडामालकाचे नाव आहे. तर सूरज मच्छिंद्र वानखेडे (वय २३, रा. जाधववाडी डॅमजवळ, नवलाख उंबरे, ता. मावळ) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पंडित जाधव हे मावळ तालुक्यातील प्रसिद्ध बैलगाडा मालक आहेत. त्यांचे काही दिवसांपूर्वी अपहरण झाले होते. आरोपींनी त्यांच्या नातेवाईकांना व्हॉट्सअॅपवरून फोन आणि मेसेज करून तब्बल ५० लाख रुपयांची खंडणी मागण्यात आली. ही माहिती पोलिसांना मिळाली. वरिष्ठ पोलिस निरीक्षक देवेंद्र चव्हाण व खंडणीविरोधी व औद्योगिक तक्रारी निवारण पथकाने जाधव यांच्या नातेवाइकांकडे य प्रकरणी चौकशी केली. तेव्हा त्यांच अपहरण झालं असल्याची बाब समजली. एवढेच नाही तर पंडित जाधव यांचा फोन बंद असतांना देखील आरोपी हे त्यांच्या मोबाइल क्रमांकावरून व्हॉट्सअॅपच्या साह्याने जाधव यांच्या नातेवाईकांना फोन करून त्यांना ५० लाख रुपयांच्या खंडणीची मागणी करत होते.

दरम्यान, पोलिसांनी या घटनेचा तपास सुरू केला. तपास पथकाने जाधव यांच्या मोबाइलचे तांत्रिक विश्लेषण केले. तसेच परिसरातील सीसीटीव्ही देखील तपासले. यात आरोपी सुरज चव्हाण पोलिसांना दिसला तसेच त्याच्या हालचाली संशयास्पद दिसल्या. दारमान, पोलिसांनी सापळा रचून त्याल अटक केली. सूरज चव्हाण हा गावी पळून जाण्याच्या तयारीत होता. तो बधलवाडी येथे असतांना त्याला पोलिसांनी अटक केली. त्यांची चौकशी केली असता, त्याचा मित्र रणजितकुमार याच्या मदतीने त्याने पंडित जाधव यांचे अपहरण केले. तसेच पूर्व वैमनस्यातून जाधव यांचा तळेगाव एमआयडीसी परिसरात दोरीने गळा आवळून खून केल्याची कबुली दिली. आरोपींनी यानंतर त्यांचा मृतदेह जाळून टाकला असून पोलिसांना संशय येऊ नये म्हणून जाधव यांच्या मोबाइलवरून खंडणीसाठी ५० लाख रुपयांची मागणी करत बनाव रचला.

पंडित जाधव हे प्रसिद्ध बैलगाडा मालक

पंडित जाधव हे मावळ तालुक्यातील बैलगाडा मालक म्हणून प्रसिद्ध आहेत. त्यांच्या मॉगी नावाच्या बैलाने अनेक मैदान मारले आहे. आरोपींनी नेमकी हत्या कोणत्या कारणावरून केली हे अद्याप स्पष्ट झाले नाही.

Whats_app_banner
विभाग
महाराष्ट्रातील बातम्या, प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर