मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Pune: लग्नात पाहिलं अन् तरुणाच्या प्रेमात पडली, पुढं तरुणीसोबत चुकीचं घडलं!
(REPRESENTATIVE IMAGE)
(REPRESENTATIVE IMAGE) (HT_PRINT)

Pune: लग्नात पाहिलं अन् तरुणाच्या प्रेमात पडली, पुढं तरुणीसोबत चुकीचं घडलं!

26 May 2023, 21:52 ISTAshwjeet Rajendra Jagtap

Pune Rape: पुण्यातील भोसरी भागात राहणाऱ्या २२ वर्षीय तरुणीवर बलात्कार केल्याप्रकरणी एका तरुणाविरोधात पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Pune Crime: पुण्यातील भोसरी भागात राहणाऱ्या तरुणीवर तिच्याच प्रियकराने बलात्कार केल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी पीडिताने पोलीस ठाण्यात तक्रार दाखल असून पोलिसांनी पुढील चौकशीला सुरुवात केली. पीडिता आणि आरोपी गेल्या वर्षी एका लग्नात ओळख झाली. या ओळखीचे रुपांतर प्रेमात झाले. त्यानंतर आरोपीने पीडिताला जबरदस्तीने शेगाव येथील एका लॉजमध्ये नेत तिच्यावर बलात्कार केला. या घटनेने संपूर्ण परिसरात खळबळ माजली आहे.

ट्रेंडिंग न्यूज

मिळालेल्या माहितीनुसार, सिद्धांत खाचणे (वय, २८) याच्याविरोधात पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली. पीडिता वर्षभराआधी छत्रपती संभाजीनगरात एका लग्नासाठी गेली होती. याच लग्नात तिची सिद्धांतशी ओळख झाली. हळूहळू दोघांचे फोनवर बोलणे वाढले. त्यानंतर मैत्रीची रुपांत प्रेमात झाले. दोघांनी एकमेकांना भेटायला सुरुवात केली. यादरम्यान सिद्धांतने आपल्या फोनमध्ये पीडिताचे अनेक फोटो काढले.

सिद्धांतला पीडिताशी लग्न करायचे होते. परंतु, पिडिताचा लग्नाला नकार होता. दरम्यान, सिद्धांतने काही दिवसांपूर्वी पीडिताला खामगाव येथे भेटायला बोलवले. त्यानंतर तिला शेगाव येथील एका लॉजमध्ये घेऊन गेला आणि तिच्यावर बलात्कार केला. तसेच तरुणीचे नको त्या अवस्थेतील फोटो काढून तिला सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी दिली. त्यानंतर पीडिताने आरोपीच्या तावडीतून सुटका करुन भोसरी पोलीस ठाण्यात आरोपीविरोधात तक्रार दिली. परंतु, ही घटना शेगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडल्याने हे प्रकरण शेगाव पोलिसांना वर्ग करण्यात आले. याप्रकरणी पोलीस शेगाव पोलिसांनी पुढील तपासाला सुरुवात केली आहे.

विभाग