Pune Rape News: विद्येचं माहेरघर म्हणून ओळखलं जाणारं पुणे शहर मागील काही वर्षांपासून गुन्हेगारी घटनांसाठी चर्चेत आहे. अशातच पुण्यातील कोथरूड पोलीस ठाण्याच्या हद्दीत संतापजनक घटना घडली. फिरायला नेतो असे सांगून एका व्यक्तीने ४ वर्षांच्या चिमुकलीवर अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली. याप्रकरणी पोलिसांनी आरोपीला चोप देऊन त्याला पोलिसांच्या ताब्यात दिले.
राजेश चोरगे (वय, ३०) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. पीडित मुलगी तिच्या घरासमोर खेळत असताना आरोपीने तिला फिरायला नेतो असे सांगून नेले. यानंतर आरोपीने पीडिताला जवळ अंधारात उभा असलेल्या बसजवळ नेले आणि तिच्याशी अश्लील कृत्य केले. मुलीचा रडण्याचा आवाज आल्यानंतर पीडिताचे आजोबा घटनास्थळी गेले. पीडिताच्या आजोबाने आणि सोसायटीच्या रहिवाशांनी आरोपीला पकडून चोप दिला. यानंतर पीडिताच्या आजोबाने स्थानिक पोलीस ठाण्यात आरोपीची फिर्याद दिली. याप्रकरणी स्थानिक पोलीस अधिक तपास करीत आहेत.
डोंबिवलीत अश्लील फोटो आई वडिलांना दाखवण्याची धमकी देत १५ वर्षीय मुलीवर वारंवार अत्याचार करण्यात आला. या त्रासाला वैतागून अखेर पीडित मुलीने रामनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. याप्रकरणी पोलिसांनी एका तरुणाविरोधात बुधवारी तक्रार दाखल केली. याप्रकरणी स्थानिक पोलीस अधिक तपास करीत आहेत.