मराठी बातम्या  /  Maharashtra  /   Pune Man Plays Pornographic Video During Patanjali Yogpeeth Online-meeting

Pune Patanjali News : पुण्यात पतंजलीच्या ऑनलाईन बैठकीत पॉर्न व्हिडीओ सुरू झाला अन्...

पुण्यात पतंजलीच्या  ऑनलाईन बैठकीत पॉर्न व्हिडीओ
पुण्यात पतंजलीच्या ऑनलाईन बैठकीत पॉर्न व्हिडीओ
Ninad Vijayrao Deshmukh • HT Marathi
Dec 22, 2022 01:34 PM IST

Pune Patanjali meeting porn video: पुण्यात पंतजलीच्या ऑनलाइन बैठकीत अचानक पोर्न व्हिडिओ सुरू झाल्याने गोंधळ उडाला

पुणे: ऑनलाइन मीटिंग म्हटल्या की अनेक गमती जमीती होत असतात. कुणी बैठका सुरू ठेऊन गायब होतात, तर मध्येच कुणाचे आवाज सुरू होत असतात, तर घरच्यांचेही आवाज येत असतात. मात्र, पुण्यात मात्र, काही तरी भलताच प्रकार एका ऑनलाइन बैठकीत घडला. पुण्यात पंतजलीची ऑनलाइन झूम मीटिंग सुरू होती. यात देशातील आणि परदेशातील अनेक जण सहभागी झाले होते. दरम्यान यावेळी एकाने अचानक पोर्न व्हिडिओ सुरू केला, आणि गोंधळ उडाला.

ट्रेंडिंग न्यूज

पतंजली योगपीठशी संबंधित असलेल्या आरोग्य संशोधन केंद्रात ही ऑनलाईन बैठक सुरू होती. पुण्यातून मीटिंगमध्ये सहभागी झालेल्या एका तरुणाने पॉर्न व्हिडीओ सुरू केला. या प्रकारामुळे काही जण संतप्त झाले. या प्रकरणी हरिद्वारच्या बहादराबाद पोलीस ठाण्यात पतंजलीशी संबंधित कमल भदौरिया आणि शिवम वालिया यांनी तक्रार दिली असून माहिती तंत्रज्ञान कायद्याच्या अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

 

दरम्यान तरुणाने हा प्रकार जाणूनबुजून केला की त्याच्या हातून चुकून घडला हे अद्याप स्पष्ट झाले नाही. हा तरुण पुण्याच्या येरवडा येथे राहत असून त्याचे नाव आकाश आहे. तो एका कॉलेज कॅम्पसमध्ये राहतो. त्याच्यावर आयटी कायद्याच्या अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. प्रकरणाचा तपास करून कारवाई करण्यात येणार आहे,

 

संबंधित बातम्या

विभाग