मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Zomato Order: पुण्यात झोमॅटोद्वारे ऑर्डर केलेल्या व्हेज बिर्याणीत आढळला चिकनचा तुकडा; धार्मिक भावना दुखावल्याचा ग्राहकाच

Zomato Order: पुण्यात झोमॅटोद्वारे ऑर्डर केलेल्या व्हेज बिर्याणीत आढळला चिकनचा तुकडा; धार्मिक भावना दुखावल्याचा ग्राहकाच

Haaris Rahim Shaikh HT Marathi
May 15, 2024 07:44 PM IST

पुण्यात एका व्यक्तिने झोमॅटोद्वारे व्हेज बिर्याणी ऑर्डर केली होती. परंतु व्हेज बिर्याणीत चिकनचा तुकडा सापडल्याने व्यक्तीचा संपात झाला. आपल्या धार्मिक भावना दुखावल्याचं सांगत संतप्त ग्राहकाने तक्रार दाखल केला आहे.

Chicken piece in paneer biryani that the man ordered from Zomato.
Chicken piece in paneer biryani that the man ordered from Zomato. (X/@Pankajshuklaji2)

झोमॅटो अॅपद्वारे कधीही, कुठेही आपले आवडते खाद्यपदार्थ झटपट मागवण्याची सोय झाली असली तरी कधीकधी या फूड डिलिव्हरी अॅपद्वारे काय गोंधळ होऊ शकतो, याचा प्रत्यय पुण्यातील एका ग्राहकाला आला आहे. पुण्यात एका व्यक्तिने ऑर्डर केलेल्या व्हेज बिर्याणी (पनीर बिर्याणी) ऐवजी चिकन बिर्याणी पाठवल्याची एक घटना पुणे शहरात समोर आली आहे. ऑर्डर केलेल्या शाकाहारी जेवणात चिकनचा तुकडा सापडल्याने आपल्या धार्मिक भावना दुखावल्याचा आरोप या व्यक्तिने सोशल मीडियाच्या माध्यमातून केला आहे.

ट्रेंडिंग न्यूज

प्राप्त माहितीनुसार पंकज शुक्ला या व्यक्तिने पुण्यातील कर्वे नगर परिसरातील ‘पीके बिर्याणी हाऊस’ येथून पनीर बिर्याणी मागवली होती. त्यात त्यांना चिकनचा तुकडा सापडला, असं पंकज शुक्ला यांनी एक्सवर (पूर्वीचे ट्विटर)वर एक व्हिडिओ शेअर करत लिहिले आहे. दरम्यान, झोमॅटोकडून या व्यक्तिला नंतर व्हेज बिर्याणी पाठवण्यात आली असली तरी आपण मी धार्मिक स्वभावाचे असल्याने माझ्या धार्मिक भावना दुखावल्या आहेत, असं शुक्ला यांनी लिहिले आहे.

‘PK Biryani House, Karve Nagar, Pune, Maharashtra येथून पनीर बिर्याणी मागवली. मला त्यात चिकनचा तुकडा सापडला (मी शाकाहारी व्यक्ती आहे). मला आधीच परतावा मिळाला आहे. पण मी धार्मिक व्यक्ती असल्याने माझ्यासाठी हे पाप आहे. त्यामुळे माझ्या धार्मिक भावना दुखावल्या गेल्या आहेत.’ असं पंकज शुक्ला यांनी ट्विट केले आहे.

दरम्यान, झोमॅटो कंपनीने सोशल मीडियावर पंकज शुक्ला यांच्या या पोस्टला उत्तर दिलं आहे. ‘हाय पंकज, आम्ही कोणाच्याही भावनांशी तडजोड करत नाही. याची काळजी घेणे हे आमचे सर्वोच्च प्राधान्य आहे. कृपया आपली ऑर्डर आयडी किंवा नोंदणीकृत फोन नंबर डीएमद्वारे शेअर करा. जेणेकरून आम्ही हे तपासू शकू.’ असं झोमॅटोद्वारे उत्तर देण्यात आलं.

दरम्यान, पंकज शुक्ला यांच्या या पोस्टवर सोशल मीडियावर इतरांनी काय काय प्रतिक्रिया दिल्या, ते पाहा:

‘शुद्ध शाकाहारी दुकानांमधून पदार्थ खरेदी करा. शाकाहारी-मांसाहारी पदार्थांची संयुक्त विक्री करणाऱ्या भोजनालयातून कधीही काहीही खरेदी करू नका!’, असं एका व्यक्तीनं पोस्ट केलं आहे.

दुसऱ्या एका व्यक्तिने लिहिलं आहे, ‘शुद्ध शाकाहारी रेस्टॉरंटमधून ऑर्डर करा.’

आणखी एका व्यक्तिने लिहिलं आहे,'तुम्ही मांसाहारी रेस्टॉरंटमधून ऑर्डर का केली?'

एअर इंडियात व्हेज जेवणार आढळला होता चिकनचा तुकडा

यापूर्वी जानेवारी महिन्यात एक महिला एअर इंडियाच्या विमानाने कोझिकोडहून मुंबईला जात असताना तिला शाकाहारी जेवण दिले गेले असता तिच्या जेवणात चिकनचे तुकडे आढळले होते. केबिन सुपरवायझरला माहिती दिल्यानंतर तिने याबद्दल महिलेची माफी मागितली होती. विमानातील आणखी एका प्रवाशानेही अशाच प्रकारची तक्रार केल्याचं या महिला विमान प्रवाशाने सांगितलं होतं.

एअर इंडियानेही या पोस्टवर कमेंट करत प्रतिक्रिया दिली होती. आहे. ‘प्रिय जैन, आपण ट्विटमधून मांडलेला तपशील डिलिट करावा, अशी विनंती करतो. त्याचा गैरवापर होई शकतो. आपल्या पीएनआर आम्हाला डीएम करावा.’

IPL_Entry_Point