dhankawadi boy suicide in Bhor : पुण्यातील धनकवडी येथील एका तरुणाने भोर येथील नीरादेवघर धरणात उडी मारून आत्महत्या केली. ही घटना रविवारी दुपारी उघडकीस आली. धरणात उडी मारण्यापूर्वी त्याने त्याच्या पत्नीला मेसेज केला. यानंतर तिने याची माहिती पोलिसांना दिली. पोलिसांनी स्थानिकांच्या मदतीने शोध मोहीम राबवली. अखेर पाच तासांच्या शोध मोहिमेनंतर रात्री ११ वाजता धरणाच्या पाण्यात त्याचा मृतदेह सापडला.
श्रीकांत विलास देशमुख असे नीरादेवघर धरणात आत्महत्या केलेल्या तरुणाचं नाव आहे. भोर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार श्रीकांत देशमुख हा रविवारी पुण्यातून १२ वाजता भोरला जण्यासाठी निघाला होता. तो भोर-महाड रस्त्यावरील वारवंड गावाजवळ असलेल्या दर्यापुलाजवळ पोहोचला असता त्याने तेथील लोकेशन बायकोला पाठवले. तसेच या ठिकाणी तो आत्महत्या करणार असल्याचा मेसेज देखील त्याने बायकोला पाठवला होता. या मुळे हदारलेल्या त्याच्या बायकोने पोलिसांना ११२ वर फोन करून याची माहिती दिली. तसेच त्याने शेअर केलेले लोकेशन देखील पाठवले. पोलिस निरीक्षक आण्णासाहेब पवार यांच्या मार्गदर्शनाखाली दुपारी ३ वाजता पोलिस हवालदार अजय साळुंके, यशवंत शिंदे, सोनाली इंगुळकर, सागर झेंडे व पोलिस पाटील सुधीर दिघे यांनी भोर-महाड रस्त्यावरील दर्यापुलापासून शोध मोहीम सुरू केली. तब्बल पाच किलोमीटरवर वारवंड हद्दीतील देवराठी येथील पुलाजवळ देशमुख यांची कार (क्र एमएच १२ आर.वाय ४२८६) पोलिसांना दिसली.
भोर पोलिसांनी ही माहिती स्थानिक नागरिकांना देत भोईराज जल आपत्ती व्यवस्थापन या रेस्क्यू पथकाला पंचरलं केले. या पथकाने भोर-महाड रस्त्यावरील वारवंड हद्दीतील देवराठी येथील पुलाजवळ शोध मोहीम सुरू केली.
मात्र, रात्र झाल्याने शोध मोहिमेत अडचणी येत होत्या. तब्बल पाच तासाच्या शोध मोहिमेनंतर रात्री ११ वाजता धरणाच्या पाण्यात श्रीकांतचा मृतदेह सापडला. दरम्यान, श्रीकांत याने हे टोकाचे पाऊल का उचलले याची माहिती मिळू शकली नाही. नवरा बायकोची भांडणे किंवा घरगुती कारणास्तव त्याने हे टोकाचे पाऊल उचलले असावे अशी शक्यता आहे.