Pune: खडकवासला धरणात तरुणाचा मृतदेह पाण्यावर तरंगताना आढळला, दारू ठरली कारणीभूत!-pune man dies by suicide jumps into khadakwasla dam ,महाराष्ट्र बातम्या
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Pune: खडकवासला धरणात तरुणाचा मृतदेह पाण्यावर तरंगताना आढळला, दारू ठरली कारणीभूत!

Pune: खडकवासला धरणात तरुणाचा मृतदेह पाण्यावर तरंगताना आढळला, दारू ठरली कारणीभूत!

Oct 05, 2023 07:45 PM IST

Pune Man Dies by Suicide: पुण्यातील खडकवासला धरणात उडी घेत एका तरुणाने आयुष्याची दोर कापली.

Death (Representative Image)
Death (Representative Image)

Pune Suicide News: पुण्यातील खडकवासला धरणात आज (०५ ऑक्टोबर २०२३) सकाळी एका तरुणाचा मृतदेह तरंगताना दिसून आल्याची पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांनी पोलिसांना माहिती दिली. यानंतर घटनास्थळी दाखल झालेल्या पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. सुरुवातील पोलिसांना घातपातचा संशय आला. मात्र, याप्रकरणी अधिक चौकशी केली असता संबंधित तरुणाने कौटुंबिक वादातून आत्महत्या केल्याचे उघड झाले.

स्वप्निल रामभाऊ कणसे (वय, ३४) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. स्वप्निल हा मूळचा बीडमधील आंबेजोगाई येथील रहिवाशी आहे. मात्र, तो गेल्या काही दिवसांपासून पुण्यातील शिवणे भागात कुटुंबियांसोबत राहत होता. स्पप्निलला दारुचे व्यसन होते. ज्यामुळे त्याचे घरातील इतर सदस्यांसोबत नेहमीच वाद होत असे. दरम्यान, काल संध्याकाळी पुन्हा असाच वाद झाल्याने स्वप्नील घरातून निघून गेला. मात्र, बराच उशीर होऊनही तो घरी न परतल्याने घरच्यांनी चिंता व्यक्त केली.

Crime: पत्नीला माहेरहून लाख रुपये आणायला सांगितलं; नकार देताच कुऱ्हाडीचे घाव घालून तिला संपवलं!

यानंतर स्वप्नीलच्या आईने उत्तमनगर पोलीस ठाण्यात तो बेपत्ता असल्याची तक्रार दिली. यानंतर पोलिसांनी आज सकाळी १० वाजताच्या सुमारास खडकवासला धरणाच्या अकरा नंबर मोरीजवळ एका तरुणाचा मृतदेह पाण्यात तरंगत असल्याचा फोन आला. पोलिसांनी घटनास्थळा धाव घेऊन पंचनामा केला. स्वप्नीलच्या घरच्यांनाही घटनास्थळी बोलवण्यात आले. त्यावेळी हा मृतदेह स्वप्नीलचा असल्याचा त्याच्या घरच्यांनी माहिती दिली.

विभाग