मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Pune: जेवणात मटण नसल्याने तळपायाची आग मस्तकात; दारुड्या नवऱ्याचे बायकोसोबत धक्कादायक कृत्य

Pune: जेवणात मटण नसल्याने तळपायाची आग मस्तकात; दारुड्या नवऱ्याचे बायकोसोबत धक्कादायक कृत्य

Ashwjeet Rajendra Jagtap HT Marathi
May 31, 2023 03:12 PM IST

Pune Crime: पुण्याच्या यरवडा येथील सुभाष नगर परिसरात जेवणात मटण बनवलं नाही म्हणून एका व्यक्तीने पत्नीच्या डोक्यात विळ्याने वार केले.

(Representative use)
(Representative use) (HT_PRINT)

Pune News: पुण्यातील येरवडा परिसरात रविवारी (२८ मे २०२३) धक्कादायक घटना घडली. जेवणात मटण नसल्याने दारुच्या नशेत असलेल्या पतीने पत्नीच्या डोक्यात मासे कापण्याच्या विळ्याने डोक्यात वार केले. या भंडणात मध्यस्ती करणाऱ्या स्वत:च्या आईलाही त्याने मारहाण केली. याप्रकरणी येरवडा पोलिसांनी पतीविरोधात तक्रार दाखल केल्यानंतर त्याला अटक करण्यात आली.

संदीप मोरे (वय, ३३) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. आरोपी हा येरवड्यातील सुभाषनगर परिसरात आपल्या कुटुंबियांसोबत राहायला असून त्याला दारुचे व्यसन आहे. दारुच्या नशेत पत्नीला वारंवार मारहाण करत असे. दरम्यान, रविवारी रात्री संदीप पुन्हा दारु पिऊन घरी आला. घरी आल्यानंतर त्याने पत्नीला जेवायला काय बनवले असे विचारले. यावर पत्नी हिरवी भाजी बनवल्याचे सांगितले. हे ऐकताच संदीप भडकला आणि मटण का बनवलं नाही, यावरुन वाद घालायला सुरुवात केली. त्यानंतर पत्नीच्या डोक्यात मासे कापण्याचा विळा मारून तिला जखमी केले. या मारहाणीत महिला गंभीर जखमी झाली असून तिच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

याप्रकरणी पीडित महिलेने येरवडा पोलीस ठाण्यात पतीविरोधात तक्रार दाखल केली. त्यानंतर पोलिसांनी संदीप मोरेला अटक केली आहे. दारूच्या व्यसनामुळे हा प्रकार घडला असल्याचे बोलले जात आहे. या प्रकरणाचा अधिक तपास येरवडा पोलिस करत आहेत. या घटनेनं येरवडा परिसरात एकच खळबळ उडाली.

WhatsApp channel

विभाग