Pune Lonikand Rape News: पुण्यात गेल्या काही दिवसांपासून गुन्हेगारीच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होत आहे. यातच पुण्यातील लोणीकंद परिसरात तरुणीला भेटायला बोलावून तिच्यावर बलात्कार केल्याची घटना उघडकीस आली. याप्रकरणी पोलिसांनी आरोपीला बेड्या ठोकल्या असून पुढील कारवाईला सुरुवात केली.
गौरव पांडूरंग बोराटे (वय, २७) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी आणि पीडिता आणि आरोपी एकमेकांना गेल्या अनेक वर्षांपासून ओळखत होते. दरम्यान, जून २०२१ मध्ये आरोपीने जीव देण्याची धमकी देत तरुणीला भेटायला बोलावून घेतले. त्यानंतर स्वत:च्या कारमध्ये तिच्यावर बलात्कार केला. तसेच या घटनेची कुठेही वाच्यता केल्यास तिच्या वडिलांना ठार मारण्याची धमकी दिली. त्यानंतर आरोपीने अनेकदा तिच्यावर बलात्कार केला.
दरम्यान, शारीरिक त्रासाला कंटाळून पीडिताने आरोपीसोबत बोलणे बंद केले. मात्र, यामुळे राग अनावर झाल्याने आरोपीने गुरुवारी रात्री पीडित तरुणीच्या घरी गेला आणि तिच्या वडिलांना शिवीगाळ केली. यानंतर पीडिताने आरोपीविरोधात स्थानिक पोलीस ठाण्यात तक्रार दिली. पीडिताच्या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपीला अटक केली. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करीत आहेत.
पुण्यातील मांजरी परिसरातील नदीपात्रात काही दिवसांपूर्वी केक कापण्याचा बहाण्याने १५ वर्षीय मुलीवर सामूहिक अत्याचार करण्यात आला. याप्रकरणी हडपसर पोलीस ठाण्यात आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यातत आला. पीडिता आणि आरोपी मित्र आहेत. वाढदिवसाचा केक कापायचा असे सांगून तिला मांजरी नदीपात्राच्या झाडीत नेले. त्यानंतर दोघांनीही तिच्यावर आळीपाळीने बलात्कार केला. त्यानंतर पीडिताला घटनास्थळी सोडून निघून गेले.