Pune Metro paid parking : सर्व सामान्य पुणेकरांच्या खिशाला आत चाप बसणार आहे. कारण पुणेकरांच्या लाडक्या मेट्रोत प्रवास करण्यासाठी असेलल्या वाहनतळासाठी आत शुल्क मोजावे लागणार आहे. सध्या मोजक्याच स्थानकावर ही सुविधा असल्याने प्रवाशांची गैरसोय होत आहे. आठ वाहनतळावर ही सुविधा आहे. या पूर्वी ही सुविधा मोफत होती. मात्र, आत या साठी शुल्क आकारण्याचा निर्णय मेट्रो प्रशासनाने घेतला आहे. या वाहनतळांवर दुचाकीसाठी १५ रुपयांपासून पुढे शुल्क घेतले जाणार आहे.
पुण्यात मोठ्या वाजत गाजत पुणे मेट्रोची सुरुवात करण्यात आली. ही मेट्रो पुण्यात काही मोजक्याच स्थानकादरम्यान, धावते. सध्या पुण्यात २० स्थानके सुरू आहेत. मात्र, यातील केवळ आठ स्थानकावर वाहनतळाची सुविधा नाही. वाहनतळ नसल्याने नागरिकांची गैरसोय होत होती. पुण्यात पिंपरी-चिंचवड, संत तुकाराम नगर, फुगेवाडी, बोपोडी, शिवाजीनगर, जिल्हा न्यायालय, मंगळवार पेठ आणि आयडियल कॉलनी या आठ स्थानकांवर वाहनतळाची सुविधा आहे. हे वाहनतळ प्रवाशांसाठी आधी मोफत होती. मात्र, आता मेट्रो प्रशासाने या ठिकाणी कंत्राटदार नेमले असून आत या ठिकाणी वाहने पार्क करण्यासाठी पैसे वसूल केले जाणार आहे.
या वाहनतळावर सायकली, दुचाकी, चारचाकीसह व्यावसायिक वाहनांसाठी उपलब्ध आहे. या सर्व वाहनतळांमध्ये बूम बॅरिअर, वीज आणि सीसीटीव्ही कॅमेरा आदी सुविधा देण्यात आल्या आहेत. या व्यतिरिक्त ॲपद्वारे बुकिंग, डिजिटल पेमेंट, पार्किंग क्षमता दर्शविणारे डिजिटल बोर्ड लावण्यात येणार आहे.
मेट्रोतून प्रवास केलेले तिकीट असल्यास प्रवाशांना वाहनतळाच्या शुल्कात २५ टक्के सवलत मिळणार आहे. तर प्रवाशांसाठी वाहनतळाची मासिक पास सुविधाही दिली जाणार आहे. मेट्रो प्रवासी दुचाकी घेऊन आल्यास वाहनतळावर त्याला हेल्मेट ठेवण्यासाठीही सुविधा दिली जाणार असून या या साठी २४ तासांचे पाच रुपये घेतले जाणार आहे. याप्रसंगी महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक श्रावण हर्डीकर म्हंटले की, "आठ मेट्रो स्थानकांवर पार्किंग सुविधा उपलब्ध केल्याने मेट्रो प्रवाशांना नक्कीच फायदा होईल"
वेळ – सायकल – दुचाकी – चारचाकी – बस/ व्यावसायिक वाहने
दोन तासांपर्यंत २ १५ ३५ ५०
दोन ते सहा तासांपर्यंत ५ ३० ५० ७०
सहा तासांपेक्षा जास्त १० ६० ८० १००