Pune Lonavla megablock : मध्य रेल्वेच्या पुणे विभागाद्वारे पुणे-लोणावळा दरम्यान, इंजीनियरिंग आणि दुरुस्तीच्या तांत्रिक कामांकरीता मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. यामुळे अनेक लोकल गाड्या रद्द करण्यात आल्या आहे. तर काही लांब पल्ल्याच्या गाड्या या उशिरा धावणार आहेत. रेल्वे प्रवाशांनी याची नोंद घेऊन तसेच रेल्वेचे वेळापत्रक तपासून प्रवास करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
- पुण्याहून लोणावळा साठी ९.५७ वाजता सुटणारी लोकल क्रमांक ०१५६२ रद्द करण्यात आली आहे.
पुण्याहून लोणावळा साठी ११.१७ वाजता सुटणारी लोकल क्रमांक ०१५६४ रद्द करण्यात आली आहे.
पुण्याहून लोणावळा साठी ३ वाजता सुटणारी लोकल क्रमांक ०१५६६ रद्द करण्यात आली आहे.
शिवाजीनगरहून तळेगाव करीता ३.४७ वाजता सुटणारी लोकल क्रमांक ०१५८८ रद्द करण्यात आली आहे.
पुण्याहून लोणावळा साठी ४.२५ वाजता सुटणारी लोकल क्रमांक ०१५६८ रद्द करण्यात आली आहे.
शिवाजीनगर वरून लोणावळा करीता ५.२० वाजता सुटणारी लोकल क्रमांक ०१५७० लोकल रद्द करण्यात आली आहे.
लोणावळ्याहून शिवाजीनगर करीता १०.५ वाजता सुटणारी लोकल क्रमांक ०१५५९ रद्द करण्यात आली आहे.
लोणावळ्याहून पुणे साठी २.५० रोजी सुटणारी लोकल क्रमांक ०१५६१ रद्द करण्यात आली आहे.
तळेगाव येथून पुणे साठी ४.४० वाजता सुटणारी लोकल क्रमांक ०१५८९ रद्द करण्यात आली आहे.
लोणावळ्याहून शिवाजीनगर करीता ५.३० वाजता सुटणारी लोकल क्रमांक ०१५६५ रद्द करण्यात आली आहे.
लोणावळ्याहून शिवाजीनगरसाठी ६.८ वाजता सुटणारी लोकल क्रमांक ०१५६७ रद्द राहील. लोणावळ्याहून पुण्यासाठी ७ वाजता सुटणारी लोकल क्रमांक ०१५६९ रद्द करण्यात आली आहे.
गाडी क्रमांक १२१६४ एमजीआर चेन्नई - लोकमान्य टिळक टर्मिनस मुंबई सुपरफास्ट एक्सप्रेस सेक्शन मध्ये ०३.३० तास उशिराने धावेल.
वरील मेंटेनन्स मेगा ब्लॉक पायाभूत सुविधांच्या देखभालीसाठी आणि सुरक्षिततेसाठी आवश्यक आहे. या पायाभूत सुविधांच्या ब्लॉकमुळे होणाऱ्या गैरसोयीबद्दल रेल्वे प्रशासनाला कृपया सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.