मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Pune Lok sabha 2024 : पुण्यात मुरलीधर मोहोळ आणि रवींद्र धंगेकर यांच्यात काटे की टक्कर? पुणेकरांची पसंती कुणाला ?

Pune Lok sabha 2024 : पुण्यात मुरलीधर मोहोळ आणि रवींद्र धंगेकर यांच्यात काटे की टक्कर? पुणेकरांची पसंती कुणाला ?

Ninad Vijayrao Deshmukh HT Marathi
Mar 21, 2024 02:40 PM IST

Pune loksabha 2024 : लोकसभेच्या निवडणुकीचं बिगुल वाजलं आहे. राज्यात यंदा काही काटे की टक्कर असलेल्या लढती बघायला मिळणार आहे. त्यात पुणे जिल्ह्यात पाहिलं तर बारामतीत पवार विरुद्ध पवार या लढतीकडे राज्याच्या राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलं असतानाच आता पुणे लोकसभेसाठीदेखील तगडे उमेदवार मैदानात उतरणार आहे.

पुण्यात मुरलीधर मोहोळ आणि रवींद्र धंगेकर यांच्यात काटे की टक्कर
पुण्यात मुरलीधर मोहोळ आणि रवींद्र धंगेकर यांच्यात काटे की टक्कर

Pune loksabha 2024 :राज्यात लोकसभेच्या निवडणुकीचं बिगुल वाजलं आहे. त्यात राज्यात यंदा काही काटे की टक्कर असलेल्या लढती बघायला मिळणार आहे. त्यात पुणे जिल्ह्यात पाहिलं तर बारामतीत पवार विरुद्ध पवार या लढतीकडे राज्याच्या राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलं असतानाच आता पुणे लोकसभेसाठीदेखील तगडे उमेदवार मैदानात उतरणार आहे. यंदा राज्यात महायुती विरुद्ध महाविकास आघडी अशी लढत रंगणार आहे. त्यात पुणे लोकसभेचं पाहिलं तर महायुतीकडून पुण्याचे अण्णा मुरलीधर मोहोळ यांना उमेदवारी देण्यात आली आहे तर त्यांच्या विरोधात महाविकास आघाडीकडून कसबा विधानसभेचे आमदार रविंद्र धंगेकरांना उमेदवारी देण्यात येणार असल्याची चर्चा आहे. असे झाल्यास पुण्यात यंदा अण्णा विरुद्ध भाऊ अशी लढत रंगतदार लढत पाहायला मिळणार आहे. 

Sonia Gandhi PC: लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर सोनिया गांधी यांचा पंतप्रधान नरेंद्र मोदींवर गंभीर आरोप

भाजपकडून तगडी चाचपणी

महायुतीकडून उमेदवारांची चाचपणी सुरु असताना भाजपमधून इच्छूकांची मोठी रांग होती. त्यात मुरलीधर मोहोळ, जगदीश मुळीक आणि सुनिल देवधरांचं नाव चर्चेत होतं. त्याच दरम्यान माजी आमदार असलेल्या मेधा कुलकर्णी यांच्या नावाचीदेखील चर्चा रंगली होती. मात्र मेधा कुलकर्णी यांन राज्यसभेवर पाठवून भाजपने आपला उमेदवार चाचपणीचा मार्ग मोकळा केला. त्यानंतर ब्राह्मण समाजावरुन विधानसभेच्यावेळी सुरु झालेल्या वादाला पुर्णविराम मिळाला. त्यानंतर भाजपकडून दोन नावं चर्चेत होती. पहिलं नाव म्हणजे मुरलीधर मोहोळ आणि दुसरं नाव म्हणजे जगदीश मुळीक. मेधा कुलकर्णी यांना राज्यसभेवर पाठवून ब्राह्मण समाजाचा वाद संपला आणि त्यासोबतच कोथरुडदेखील काबीज करण्यात अंशत: यश आलं. त्यामुळे आता जगदीश मुळीकांना उमेदावरी देऊन वडगावशेरी आणि त्याआजूबाजूचा परिसर आपला करुन घेण्याचा भाजपचा प्रयत्न सुरु होता. मात्र भाजपने जाहीर केलेल्या सरप्राईज यादीत थेट मुरलीधर मोहोळांचं नाव समोर आलं आणि जगदीश मुळीकांचा पत्ता कट झाला.

No- Shampoo Trend: 'नो-शॅम्पू' ट्रेंड फॉलो करताय? वेळीच सावध व्हा, तज्ज्ञांनी व्यक्त केली भीती!

कोण आहेत मुरलीधर मोहोळ?

मुरलीधर मोहोळांचा पुण्यात आणि आजूबाजूच्या परिसरात दांडगा जनसंपर्क आहे. ते पुणे महानगरपालिकेचा सभासद म्हणून चार वेळा विजयी २००२, २००७, २०१२ आणि २०१७ झाले आहेत. २०१७-१८ पुणे महानगरपालिका स्थायी समिती अध्यक्ष राहिले होते. २०१९- २०२२ मध्ये पुणे महानगर पालिकेचे महापौर होते. कोरोना काळात मोहोळांनी आपलं पुणेकराप्रती असलेली काळजी आणि प्रेम दाखवून दिलं आणि महत्वाचं म्हणजे ते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे निकटवर्तीय मानले जातात. राज्यातील प्रमुख नेत्यांपासून केंद्रातील नेत्यापर्यंत प्रत्येक वरिष्ठ नेत्याशी त्यांचा चांगला संपर्क आहे.

विधानसभेनंतर लोकसभेसाठी मैदानात उतरले धंगेकर!

पुणे लोकसभेसाठी भाजपच्या उमेदवाराची घोषणा झाली. मुरलीधर मोहोळांचं नाव चर्चेत आलं. त्यानंतर महाविकास आघाडीच्या उमेदवाराच्या नावाच्या घोषणेची प्रतिक्षा होती. त्यात महाविकास आघाडीकडून पुण्याची जागा कॉंग्रेसला सोडण्यात आली आहे. त्यामुळे मुरलीधर मोहोळांना काटे की टक्कर देऊ शकणारा उमेदवार देण्याचं आव्हान महाविकास आघाडीकडे म्हणजेच कॉंग्रेसकडे होतं. त्यात कंॉग्रेसकडून मोहन जोशी, अरविंद शिंदे आणि सोबतच ज्यांनी विधानसभेत भाजपच्या बालेकिल्ल्याचा ४० वर्षांनी सुरुंग लावला ते म्हणजे रविंद्र धंगेकरांच्या नावाच्या चर्चा होत्या. कॉंग्रेसमध्येदेखील उमेदवारांची चाचपणी सुरु होती. मात्र याचदरम्यान पुणे मनसेचे नेते वसंत मोरे यांनी मनसेला राम राम ठोकला आणि महाविकास आघाडीच्या प्रमुख नेत्यांच्या भेटीचा धडाका लावला. पुण्यात शरद पवारांनी भेट घेतल्यानंतर थेट मुंबई गाठून त्यांनी संजय राऊतांची भेट घेतली. त्यानंतर थेट लोकसभेसाठी ईच्छूक असल्याचं महाविकास आघाडीच्या नेत्यांना बोलून दाखवलं. पुणे मुंबई झाल्यानंतर थेट आमदार रविंद्र धंगेकरांची भेट घेतली आणि लोकसभेसाठी आणि पुणेकरांच्या प्रश्नांसाठी सक्षम असल्याचं दाखवलं. मात्र कॉंग्रेसकडून कसलाही विचार न करत रविंद्र धंगेकरांचं नाव आधीपासून चर्चेत होतंच. वसंत मोरेंचा ट्विस्ट आणि बाकी कॉंग्रेस नेत्यांचे मन राखत. कॉंग्रेसने रविंद्र धंगेकरांना उमेदवारी जाहीर  करणार का या कडे लक्ष आहे. 

Virat Kohli: आयपीएल २०२४ च्या पहिल्याच सामन्यात कोहली इतिहास रचणार? विश्वविक्रमापासून फक्त ६ धावा दूर!

विधानभेत कसबा आता लोकसभेच पुणं काबीज करणार?

लोकसभेच्या निवडणुकीत दिल्लीला जाणार का? असं विचारल्यावर सुरुवातीला धंगेकरांनी नकार दिला. मात्र पक्षात जसा त्यांचा जम बसत गेला तशी धंगेकरांनी लोकसभेसाठीची तयारी सुरु केली आणि समोर कोणताही उमेदवार असू दे निवडणूक लढणार आणि जिंकणार असं चंग बांधला असून  आता लोकसभेसाठी मैदानात उतरण्याच्या तयारीत आहेत. 

धंगेकर विरुद्ध मोहोळ?

कोरोनाच्या काळात लोकांच्या मनात घर केलेले मुरलीधर मोहोळांनी उमेदवारी जाहीर होताच कसब्याच्या गणपतीचं दर्शन घेतलं आणि पुणं पिंजून काढायला सुरुवात केली. त्यातच भाजपच्या ४० वर्षांच्या बालेकिल्ल्याला सुरुंग लावलेल्या आणि सामन्य माणूस आणि माणसातला माणूस अशी ओळख असलेले रविंद्र धंगेकरांनीदेखील मैदानात उतरले आहेत. दोघेही पुणेकरांच्या पसंतीचे आहेत. दोघांचाही पुणेकरांच्या मनात चांगली प्रतिमा आहे. त्यामुळे या लोकसभेच्या निवडणुकीत पुण्यात तगडी लढत होणार आहे. मात्र पुणेकर कायम विकासाला प्राधान्य देत आले आहेत. जो उमेदवार विकास करु शकेल त्याच उमेदवाराला पुणेकर पसंती देण्याची शक्यता आहे.

 

WhatsApp channel