Pune Drugs Party Case : पुण्यात गेल्या शनिवारी पुण्यातील फर्ग्युसन रस्त्यावर असणाऱ्या L3 बार हॉटेलमध्ये पार्टी रंगली होती. या पार्टीतील तरुणाचे धिंगाणा घालतांनाचे आणि बाधरूममध्ये ड्रग्स सेवन करतांनाचे व्हिडिओ व्हायरल झाले होते. यामुळे पुण्यातील हॉटेल आणि पबचा मुद्दा पुन्हा पुढे आला होता. या प्रकरणी पुणे पोलिसांनी दोन बीट मार्शल यांना निलंबित केले होते. आता या प्रकरणी उत्पादन शुल्क विभागाने मोठी कारवाई केली आहे. उत्पादन शुल्क विभागाच्या (State Excise Department) पोलिसांनाही हे प्रकरण भोवलं असून कर्तव्यात कसून केल्याचा ठपका ठेवत या विभागाचे पोलीस निरीक्षक व्ही. बी. बोबडे यांना निलंबित करण्यात आले आहे. राज्य उत्पादन शुल्क विभागाने ही कारवाई केली आहे. तर या पूर्वी या पार्टी प्रकरणी L3 बार हॉटेल सील करण्यात आले आहे.
पुण्यातील ड्रग्स केसची सोमवारी थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दखल घेतली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सोमवारी पोलिस आयुक्त अमितेशकुमार यांना निर्देश देत पुणे शहरातील बेकायदेशीर पब्जवर कठोर कारवाई करावी व अमली पदार्थ विक्रेत्यांविरुद्ध नव्याने कठोर कारवाई सुरु करावी अशा सूचना दिल्या. ऐवढेच नाही तर यासंदर्भातील अनधिकृत बांधकामांवर बुलडोझर फिरवून कठोर कारवाई असे आदेश देखील मुख्यमंत्री शिंदे यांनी दिले आहेत.
पुण्यातील L3 बारमध्ये शनिवारी झालेल्या पार्टी प्रकरणी पोलीस निरीक्षक व्ही. बी. बोबडे यांनी कर्तव्यात कसूर केल्याप्रकरणी त्यांना निलंबन करण्यात आले. एल थ्री बार हा बोबडे यांच्या कार्यक्षेत्रात येत होता. जेव्हा ही पार्टी सुरू होती तेव्हा ते त्यांच्या परिक्षेत्रात नव्हते. ही बाब राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या लक्षात आल्याने या विभागाच्या आयुक्तांनी बोबडे यांना निलंबित करण्याचे आदेश दिले आहेत.
शिवाजी नगर परिसरातील फर्ग्युसन रस्त्यावरील हॉटेल एल थ्री रेनबो येथे एक पार्टी रंगली असून यात मद्य प्राशन व ड्रग्ज सेवन करत असल्याचे तरुणांचे व्हिडिओ व्हायरल झाल्यावर राज्य उत्पादन शुल्क घटनास्थळी प्रत्यक्ष जाऊन पाहणी करण्याचे निर्देश दिले गेले हॉटे. राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या निरीक्षकांनी व्यवस्थापक मोहित राजेश शर्मा यांचा जबाब घेतला व २३ जून रोजी आरोपपत्र दाखल करत मद्य आणि अंमली पदार्थ विरोधी नियमाचं उल्लंघन होत असल्याने हे हॉटेल सील केले होते. या दरम्यान, या परीक्षेत्राची जबादरी असलेले राज्य उत्पादन शुल्क पुणे बी विभागाचे पोलिस निरीक्षक व्ही. बी. बोबडे यांनी या ठिकाणी जाऊन तेथे कारवाई करणे गरजेचे असतांना ते कार्यक्षेत्रात उपस्थित नव्हते. तसेच त्यांनी कोणतीही कारवाई केली नाही. या दरम्यान, राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधीक्षकांनी बोबडे यांना फोन केला असता, ते मुख्यालयात नसल्याचे पुढे आले. यापूर्वीसूध्दा त्यांच्या कार्यक्षेत्रात उपअधीक्षकांनी अवैध धंदे उघडकीस आणल्यावर कारवाई करण्याचे निर्देश देऊन सुद्धा त्यांनी कारवाई न केल्याने बोबडे यांना निलंबित करण्यात आल्याचे म्हटले आहे.
संबंधित बातम्या