Pune Crime news : पुण्यात कोरेगाव पार्क येथील एका मोठ्या कॉलेजमध्ये एका अल्पवयीन तरुणीवर चौघांनी बलात्कार केल्याचं उघड झालं आहे. सोशल मीडियावरून झालेल्या ओळखीतून आरोपींनी मुलीला भेटायला बोलावले होते. त्यावेळी चौघांनी तिच्यावर वेगवेगळ्या ठिकाणी अत्याचार केला. हे प्रकरण चार महिन्यांनी उघडकीस आले होते. या प्रकरणी आमदार रवींद्र धंगेकर यांनी पुणे पोलिसांना पत्र लिहिले असून यात त्यांनी धक्कादायक खुलासे केले आहेत. पिडीत मुलगी ही एका प्राध्यापकाची मुलगी असून या बाबत प्राध्यापकाने ट्रस्टींकडे तक्रार केली होती, परंतु आरोपी मुले ही बड्या बापाची मुळे असल्याने ट्रस्टींनी हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप धंगेकरांनी केला आहे.
आमदार रवींद्र धंगेकर यांनी पोलिसांना लिहिलेल्या पत्रात आरोपी मुळे ही धनिक पुत्र असल्याचा आरोप केला आहे. यातील एक मुलगा हा उप-जिल्हाधिकारी (प्रांत-अधिकारी) यांचा मुलगा असल्याचे त्यांनी पत्रात म्हटलं आहे. या अधिकाऱ्याचे संस्थेच्या ट्रस्टींशी आर्थिक हितसंबंध असल्याच आरोप देखील रवींद्र धंगेकर यांनी केला आहे. त्यामुळे आरोपी मुलाला वाचविण्याकरीता पीडित मुलीच्या वडिलांवर दबाव आणत जात असून संस्थेचे ट्रस्टींशी आणि महाविद्यालयांचे अधिकारी यांची भूमिका संशयास्पद असल्याचं देखली आमदार रविंद्र धंगेकर यांनी म्हटलं आहे. धंगेकर यांनी हे पत्र एक्सवर पोस्ट केले आहे. पिडित मुलीच्या पालकांवर संस्थेने दबाव आणला का? बड्या बापाच्या मुलांना या प्रकरणी वाचवलं जात आहे का ? ऊयकझा सखोल तपास करण्याची मागणी देखील त्यांनी केली आहे.
पीडिता पुण्यातील एका नामांकित महाविद्यालयात शिक्षण घेत आहे. याप्रकरणी पीडितेच्या तक्रारीवरून पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी ४ जणांना अटक केली असून यातील दोन आरोपी अल्पवयीन असल्याचे सांगितले जात आहे. पीडित अल्पवयीन मुलीवर चौघांनी लैंगिक अत्याचार केल्याची माहिती समोर आली आहे. पोलिसांनी पोक्सोसह बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे. पीडित तरुणीवर गेल्या चार महिन्यापासून तरुणीसोबत हा प्रकार सुरू होता. चार आरोपी एकमेकांना ओळखत नाहीत. त्यांनी वेगवेगळ्या वेळी तरुणीला बोलावून तिच्यावर अत्याचार केले. मिळालेल्या माहितीनुसार पीडित तरुणी तिच्या वडिलांच्या फोनवरून सोशल मीडिया वापरत होती. याच्या माध्यमातून तिची आरोपी तरुणांशी मैत्री झाली. त्यातील एकाने तिला महाविद्यालयात भेटायला जाऊन तेथेच तिच्यावर अत्याचार केले.
दुसऱ्या आरोपीने तिच्या घरी जाऊन तिच्यासोबत शारीरिक संबंध ठेवले. अन्य दोन आरोपींनीही तिला वेगवेगळ्या ठिकाणी भेटायला बोलावून तिच्यावर अतिप्रसंग केला. याबाबतची माहिती पीडितेने तिच्या मैत्रिणीला सांगितल्या होत्या. तसेच महाविद्यालयात सुरू असलेल्या 'गुड टच बॅड टच' अभियानात असलेल्या समुपदेशक तिने आपल्यासोबत घडत असलेला प्रकार सांगितला.