मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  kondhwa News : पार्टीसाठी चिकन दिलं नाही म्हणून दुकानदाराला भोसकले; पुण्याच्या कोंढव्यातील घटना

kondhwa News : पार्टीसाठी चिकन दिलं नाही म्हणून दुकानदाराला भोसकले; पुण्याच्या कोंढव्यातील घटना

Ninad Vijayrao Deshmukh HT Marathi
Jan 04, 2024 09:49 AM IST

Pune kondhwa crime : पुण्यात गुन्हेगारीच्या घटना वाढत आहे. कोंढव्यात पार्टीसाठी चिकन दिले नाही म्हणून दुकानदाराला मारहाण करत चाकूने भोसकल्याची घटना उघडकीस आली आहे.

Pune Crime News
Pune Crime News

pune crime news update : पुण्यात गुन्हेगारीचा आलेख हा दिवसेंदिवस वाढत चालला आहे. कोयता गँगची दहशत कायम असतांना अनेक छोटे मोठे गुन्हे करणाऱ्या टोळ्या देखील पुण्यात टायर झाल्या आहेत. दरम्यान, पुण्यात कोंढवा येथे धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. पार्टी करण्यासाठी चिकन दिले नाही म्हणून दुकानदाराला मारहाण करून चाकूने भोसकले असल्याची घटना उघडकीस आली आहे.

Pune ola uber rent hike : पुणेकरांच्या खिशाला बसणार झळ; ओला आणि उबरचा गारेगार प्रवास महागला; असे आहे नवे दर !

सुफियान आयुब शेख असे आरोपीचे नाव आहे. तर अब्दुला शेख असे हल्यात जखमी झालेल्या दुकानदाराचे नाव आहे. ही घटना सोमवारी रात्री ११ च्या सुमारास कोंढवा येथील मिथनगर भागातील आयशा चिकन सेंटर येथे घडली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार या प्रकरणी अब्दुला हाशिम शेख (वय २३) याने कोंढवा पोलिसात ठाण्यात तक्रार दिली. त्यानुसार आरोपी सुफियान अय्युब शेख याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Rohit Pawar On Jitendra Awhad : 'देव आणि धर्माऐवजी लोकांच्या मुद्यांवर बोला'; रोहित दिला जितेंद्र आव्हाडांना घरचा आहेर

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी अब्दुला शेख यांचे कोंढव्यातील मिठानगर येथे आयशा चिकन सेंटर नावाचे दुकान आहे. सोमवारी १ जानेवारी रोजी रात्री ११ च्या सुमारास अब्दुला शेख हे दुकान बंद करत होते. यावेळी त्यांच्या तोंड ओळख असणारा आरोपी सुफियान शेख दुकानात आला. सुफियान याने त्याच्याकडे चिकन मागितले. पण अब्दुलाने त्याला नाही म्हणून सांगितले. दुकान बंद करत आहे, चिकन मिळणार नाही असे अब्दुलाने सुफियान याला सांगितले. याचा राग सुफियानला आला. सुफियानने अब्दुला याला मारहाण करत चिकन का देत नाही म्हणून शिवीगाळ आणि मारहाण करू लागला. एवढेच नाही तर त्याने दुकानातील चाकू अब्दुला शेख यांना भोसकून जखमी केले.

या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून दहशतीचे वातावरण आहे. कोंढवा पोलिस या प्रकरणाचा पुढील तपास करीत आहेत. आरोपी सुफियाना फरार असून पोलिस त्याचा शोध घेत आहेत.

WhatsApp channel