पाच वर्षांच्या मुलाला अश्लील व्हिडिओ दाखवून मोठ्या भावासमोरच तिघांकडून अनैसर्गिक अत्याचार, पुण्यातील कोंढवा येथील घटना
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  पाच वर्षांच्या मुलाला अश्लील व्हिडिओ दाखवून मोठ्या भावासमोरच तिघांकडून अनैसर्गिक अत्याचार, पुण्यातील कोंढवा येथील घटना

पाच वर्षांच्या मुलाला अश्लील व्हिडिओ दाखवून मोठ्या भावासमोरच तिघांकडून अनैसर्गिक अत्याचार, पुण्यातील कोंढवा येथील घटना

Published Oct 05, 2024 11:47 AM IST

Pune Crime news : पुण्यात गेल्या काही दिवसांपासून लैंगिक अत्याचारच्या घटना मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत. आज देखील एका पाच वर्षाच्या मुलावर अनैसर्गिक अत्याचार करण्यात आल्याची घटना उघडकीस आली आहे.

पुण्यातील कोंढव्यात पाच वर्षांच्या मुलाला अश्लील व्हिडिओ दाखवत तिघांचा मोठ्या भावासमोर अनैसर्गिक अत्याचार
पुण्यातील कोंढव्यात पाच वर्षांच्या मुलाला अश्लील व्हिडिओ दाखवत तिघांचा मोठ्या भावासमोर अनैसर्गिक अत्याचार

Pune kondhwa crime news : पुण्यात गेल्या काही दिवसांपासून अल्पवयीन मुलांवर लैंगिक अत्याचाराच्या घटन मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत. या पूर्वी वानवडी येथील एका शाळेच्या स्कूलबसमधे दोन मुलींवर लैंगिक अत्याचार करण्यात आले होते. तर खराडी येथे देखील एका ३ वर्षीय मुलीवर अत्याचार करण्यात आले होते. या दोन्ही घटना ताज्या असतांना पुण्यातील कोंढवा येथे आणखी एक घटना उघडकीस आली आहे. या घटनेत एका पाच वर्षांच्या मुलांवर तिघांनी अनैसर्गिक अत्याचार केल्याचं उघड झालं आहे.

अश्लील व्हिडिओ दाखवत अत्याचार

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार ही घटना कोंढवा परिसरात घडली. तीन अल्पवयीन आरोपींनी पाच वर्षांच्या मुलावर लैंगिक अत्याचार केले. त्या आधी आरोपींनी या लहान मुलाला अश्लील व्हिडीओ दाखवला. यानंतर या मुलांच्या मोठ्या भावसमोर त्यांनी मुलासोबत अनैसर्गिक अत्याचार केले. या प्रकरणी तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सोसायटीच्या आवारात खेळत असतांना केलं कृत्य

पीडित मुलगा हा त्याच्या भावासोबत सोसायटीच्या आवारात खेळत होता. यावेळी आरोपी हे त्याच्या जवळ आले. यावेळी त्यांनी मुलाला मोबाईलवर अश्लील व्हिडीओ दाखवला व त्याच्यावर अत्याचार केले. हा प्रकार त्याने घरी सांगितला. यानंतर मुलाच्या पालकाणे या प्रकरणी कोंढवा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

पुण्यात बलात्कार अत्याचाराच्या घटना वाढल्या.

पुणे हे विद्येचे माहेर घर. तसेच पुण्याला राज्याची सांस्कृतिक राजधानी देखील संबोधले जाते. मात्र, पुण्याची ही ओळख आता बदलू लागली आहे. या नगरीत गुन्हेगारी वाढली आहे. गेल्या संत महिन्यात पुण्यात २६५ बलात्काराच्या व ४५० विनयभंगाच्या घटना घडल्या आहेत. त्यामुळे या वाढत्या घटनांवरून पुण्यात महिला व मुली असुरक्षित असल्याचं उघड झालं आहे.

खराडी येथे तिसरीतील मुलीवर अत्याचार

पुण्यातील खराडी येथील एका शाळेत तिसरीत शिकणाऱ्या मुलीवर लैंगिक अत्याचार करण्यात आल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी चंदन नगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. १ ऑक्टोंबरला या मुलीची आई तिला गुड टच व बॅड टचसंदर्भात माहिती देत होती. यावेळी तिने शाळेत तिच्यासोबत घडलेला प्रकार सांगितला. त्यानंतर आईने शाळेतील मुख्यध्यापकांना याची माहिती दिली. दरम्यान, पोलिस आरोपीचा शोध घेत आहेत.

Whats_app_banner

संबंधित बातम्या

विभाग
महाराष्ट्रातील बातम्या, प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर