Pune karvenagr murder: चारित्र्याच्या संशयावरून पत्नीची कुऱ्हाडीने वार करून हत्या; फरार होणाऱ्या पतीला पाच तासांत बेड्या
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Pune karvenagr murder: चारित्र्याच्या संशयावरून पत्नीची कुऱ्हाडीने वार करून हत्या; फरार होणाऱ्या पतीला पाच तासांत बेड्या

Pune karvenagr murder: चारित्र्याच्या संशयावरून पत्नीची कुऱ्हाडीने वार करून हत्या; फरार होणाऱ्या पतीला पाच तासांत बेड्या

Jan 03, 2024 09:16 AM IST

Pune karvenagr murder : पुण्यात कर्वेनगर येथे चारित्र्याच्या संशयावरून पत्नीची हत्या करण्यात आल्याची घटना उघडकीस आली असून आरोपीला ५ तासांत अटक करण्यात आली आहे.

Pune karvenagr murder
Pune karvenagr murder

Pune karvenagr murder : पुण्यात चारित्र्याच्या संशयाववरुन पतीने फारशी आणि कुऱ्हाडीने पत्नीच्या डोक्यात वार करून तिची हत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. ही घटना कर्वेनगर येथे मंगळवारी दुपारी घडली. यानंतर आरोपी फरार झाला होता. ट्याला पाच तासात अटक करण्यात आली आहे.

Mumbai water cut : मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! 'या' कारणांमुळे गुरुवार पासून २४ तास राहणार पाणीपुरवठा बंद; वाचा!

लखन बालाजी कांबळे असे आरोपीचे नाव आहे. लखन कांबळे हा त्याच्या पत्नीच्या चारित्र्यावर नेहमी संशय घ्यायचा. यावरुन त्यांच्यात वाद व्हायचे. मंगळवारी हा वाद टोकाला गेला. लखनने रागाच्या भरात घरातील फरशी कु-हाडीने पत्नीच्या डोक्यात वार करुन तिचा खून केला. यानंतर तो घरातून पळून गेला. या घटनेची माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी दाखल झाले.

Shirdi News : मोठी बातमी! काँग्रेसच्या शिर्डी शहराध्यक्षावर जीवघेणा हल्ला, रॉडने केली बेदम मारहाण

त्यांनी आरोपीला पकडण्यासाठी तातडीने दोन पथकाची स्थापना केली. तपास पथकाचे अधिकारी पोउपनिरी पार्वे यांना बातमीदारामर्फत आरोपी हा त्याच्या मुळ गावी उस्मानाबाद येथे सोलापुर हायवेने दुचाकीवरून पळून जात असल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी त्याचा माग घेण्यास सुरुवात केली.

आरोपी हा यवत येथुन माघारी येत असतांना तपास पथकाने त्याचा पाठलाग करून लोणीकाळभोर टोलनाक्या जवळ पकडले. यानंतर त्याला या बाबत विचारणा केली असता त्याने खुनाची कबुली दिली. य याप्रकरणी वारजे माळवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे.

Whats_app_banner

संबंधित बातम्या

विभाग
महाराष्ट्रातील बातम्या, प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर