मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Porsche Accident : ‘मिली बेल, फिर से दिखाऊंगा सडक पे खेल’, बिल्डरपुत्राच्या रॅप साँगबाबत नवी माहिती आली समोर

Porsche Accident : ‘मिली बेल, फिर से दिखाऊंगा सडक पे खेल’, बिल्डरपुत्राच्या रॅप साँगबाबत नवी माहिती आली समोर

May 23, 2024 07:17 PM IST

Porsche Car Accident : दोन जणांचा बळी घेतल्यानंतर या अल्पवयीन आरोपीने रॅप साँग तयारकरत शिवीगाळ केली आहे. हा व्हिडिओ समोर आल्यानंतर हा माज व मुजोरी येते कुठून, असा संतप्त सवाल केला जात आहे.

दोघांचे बळी घेतल्यावर बिल्डरपुत्राचे संताप आणणारे रॅप साँग
दोघांचे बळी घेतल्यावर बिल्डरपुत्राचे संताप आणणारे रॅप साँग

पुण्यात दारूच्या नशेत बेफाम गाडी चालवून दोन जणांचा बळी घेणाऱ्या बिल्डर पुत्राचा एक व्हिडिओ समोर आला होता.  ड्रंक अँड ड्राईव्ह प्रकरणात बालसुधार गृहात गेलेल्या अल्पवयीन आरोपचा आणखी एक उद्दामपणा त्याच्या व्हिडिओमधून समोर आला आल्याचे बोलले जात होते. दोन जणांचा बळी घेतल्यानंतर या अल्पवयीन आरोपीने रॅप साँग तयार करत शिवीगाळ केली केल्याचे दिसून येत होते. मात्र आता या व्हिडिओबाबत नवी माहिती समोर आली आहे.

ट्रेंडिंग न्यूज

दरम्यान नेटीझन्सकडून संतप्त प्रतिक्रिया येत असलेल्या या व्हिडिओची तपासली असता या व्हिडिओ दिसणारा मुलगा पोर्शे कार अपघातातील आरोपी नसून अमेय नावाचा सोशल मीडिया इन्फ्लुएंसर असल्याचे समोर आले आहे. हा तरुण त्याच्या सोशल मीडिया अकाउंटवरून अश्लील कटेंट टाकत असतो.

पुण्यातील कल्याणीनगर येथे पोर्शे कारने दोन जणांना उडवून त्यांचा जीव घेतल्याप्रकरणी बिल्डरच्या अल्पवयीन मुलाला अटक केल्यानंतर काही तासातच जामीन मिळाला. हा जामीन मिळाल्यानंतर ते बालसुधार गृहात रवानगी करेपर्यंत या आरोपींने एक रॅप साँग तयार करून पुन्हा आपला माज दाखवला असल्याचे बोलले जात होते. मात्र त्याच्यासारखाच दिसणाऱ्या तरुणाने लोकांनी शिवीगाळ करणारं रॅप साँग म्हणत याचा सेल्फी व्हिडिओ  शूट केला आहे. या रॅप साँगमध्ये त्याने मुजोरी दाखवत संताप येईल असे शब्द त्याने उच्चारले आहेत. 

दरम्यान हा व्हिडिओ कधी शूट केला आहे व यामध्ये दिसणारा तरुण पोर्शे अपघात प्रकरणातील आरोपी आहे की, कोणी अन्य आहे, याचा तपास केल्यानंतर हा तरुण दुसराच असल्याचे समोर आले.

या व्हायरल होत असलेल्या रॅप साँगमध्ये काय आहे? 

करके बैठा मै नशे...

इन माय पोर्शे

सामने आया कपल मेरे

अब वो है निचे

साऊंड सो क्लिंचे

सॉरी गाडी चढ आप पे

१७ साल की उमर

पैसे मेरे बाप पे

१ दिन में मिल गयी मुझे बेल

फीर से दिखा दुंगा सडक पे खेल

प्लेइंगद केरोसिन फोन्क इन माय नेक्स्ट स्पोर्ट्स कार

चार यार मेरे साथ, सिधे फाड देते गां+++

 

पुण्यातील विमानतळ रस्त्यावर कल्याणीनगर येथे रविवारी रात्री अडीच वाजता दारु पिऊन २०० च्या स्पीडने गाडी चालवून बिल्डरच्या या ‘बाळ’राजाने एका जोडप्याला उडवलं. ही धडक इतकी भीषण होती की, बाईकवर मागे बसलेली तरुणी २० फूट हवेत उडून जमिनीवर आपटली तर तरुण दुसऱ्या कारच्या टपावर आदळला. या अपघातात त्यांचा जागीच मृत्यू झाला. अपघातानंतर आरोपीला जमावाने पकडून बेदम मार देऊन पोलिसांच्या हवाली केली. 

याप्रकरणी त्याला ज्युएनाईल जस्टीस बोर्ड म्हणजेच बाल न्यायालय मंडळाने काही तासातच जामीन मंजूर केला. त्यानंतर पोलिसांनी पुन्हा कोर्टात धाव घेत आदेशावर पुनर्विचार करण्याची मागणी केल्यानंतर तसेच सोशल मीडियावर संतप्त प्रतिक्रिया उमटू लागल्यानंतर बाल न्यायालय बोर्डाने या बिल्डर पुत्राचा जामीन रद्द करुन त्याला १४ दिवस म्हणजे ५ जूनपर्यंत बाल सुधारगृहात पाठवण्याचा आदेश दिला. 

टी-२० वर्ल्डकप २०२४

विभाग