Pune Accident : पुण्यातील कल्याणीनगरमध्ये हिट अँड रन; कंटेनरने दोघांना उडवले, फरार चालकाला अटक-pune kalyaninagar accident truck hit bike one dead accused arrest ,महाराष्ट्र बातम्या
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Pune Accident : पुण्यातील कल्याणीनगरमध्ये हिट अँड रन; कंटेनरने दोघांना उडवले, फरार चालकाला अटक

Pune Accident : पुण्यातील कल्याणीनगरमध्ये हिट अँड रन; कंटेनरने दोघांना उडवले, फरार चालकाला अटक

Aug 07, 2024 08:06 PM IST

Pune Accident : कल्याणीनगरमध्ये २० जानेवारी २०२४ रोजी एका कंटेनरने दुचाकीला धडक दिली होती. यामध्ये एक जणाचा मृत्यू झाला,तर दुसरा व्यक्ती जखमी आहे. या अपघतानंतर कंटेनर चालक फरार झाला होता. पोलिसांनी त्याला बेड्या ठोकल्या आहेत.

पुण्यातील कल्याणीनगरमध्ये हिट अँड रन
पुण्यातील कल्याणीनगरमध्ये हिट अँड रन

Pune Accident :  पुण्यातील कल्याणीनगरमध्ये एअरपोर्ट रोडवर दोन महिन्यापूर्वी झालेल्या  पोर्शे अपघातातील घटनेने महाराष्ट्रासह देशभरातील वातावरण ढवळून निघाले होते. या प्रकरणाचा कोर्टात अद्याप खटला सुरू आहे. मद्यपान केलेल्या अल्पवयीन मुलाने अलिशान पोर्शे गाडीने दुचाकीला उडवले होते. यात आयटी कंपनीत नोकरीला असलेल्या तरुण-तरुणीचा जागीच मृत्यू झाला होता. हा अपघात जेथे झाला होता त्याच कल्याणीनगर परिसरात आणखी एक अपघात समोर आला आहे. 

या अपघातात दुचाकीवर मागे बसलेला तरुण ईशान सुनील करवडे (वय ३४) याचा मृत्यू झाला होता. तर चालक गौरव खांडरे हा गंभीर जखमी झाला होता.

कल्याणीनगरमध्ये २० जानेवारी २०२४ रोजी एका कंटेनरने दुचाकीला धडक दिली होती. यामध्ये एक जणाचा मृत्यू झाला, तर दुसरा व्यक्ती जखमी आहे. या अपघतानंतर कंटेनर चालक फरार झाला होता. पोलिसांनी त्याला बेड्या ठोकल्या आहेत. 

भरधाव कंटेनरने पुणे-नगर रस्त्यावरील कल्याणीनगर येथे दुचाकीला धडक दिली. या अपघातात पाठीमागे बसलेल्या तरुणाचा मृत्यू झाला होता. तर मोटारसायकलस्वार गंभीर जखमी झाला होता. मोटारसायकलीला धडक दिल्यानंतर कंटेनर चालक फरार झाला होता. येरवडा पोलिसांनी या घटनेचा तपास करत फरार चालकाला अटक केली आहे. यासाठी पोलिसांनी परिसरात व या रस्त्यावर लावलेले १०० हून अधिक सीसीटीव्ही फुटेजचा तपास केला होता.

हा अपघात ८ महिन्यापूर्वी म्हणजे २० जानेवारी रोजी पहाटे साडेचार वाजता झाला होता. पुणे नगर रस्त्यावरील कल्याणी नगर जंक्शन येथे दुचाकीला कंटेनरने धडक दिली होती. 

अपघातानंतर कंटेनर चालक फरार झाला होता. याप्रकरणी आरोपी कंटेनर चालकाविरुद्ध येरवडा पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केलेला होता. अपघाताचा तपास करताना पोलीस पथकाने १०० हून अधिक सीसीटीव्ही फुटेज तपासले. त्यामध्ये आढळले की, अपघातग्रस्त कंटेनरचा क्रमांक MH 46 -AR 4836 असून यावर चालक मोहम्मद आशिम हातिम अन्सारी (वय ३४, रा. कुनारा, झारखंड) हा असल्याचे व त्यानेच हा अपघात केल्याचे निष्पन्न झाले. त्याला अटक करण्यात आली आहे.

विभाग