खासगी गाडीवर लाल दिवा, वरिष्ठ अधिकाऱ्याच्या चेंबरवर डल्ला मारून चमकोगिरी करणाऱ्या पुण्यातील ट्रेनी आयएएसची वाशिमला बदली
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  खासगी गाडीवर लाल दिवा, वरिष्ठ अधिकाऱ्याच्या चेंबरवर डल्ला मारून चमकोगिरी करणाऱ्या पुण्यातील ट्रेनी आयएएसची वाशिमला बदली

खासगी गाडीवर लाल दिवा, वरिष्ठ अधिकाऱ्याच्या चेंबरवर डल्ला मारून चमकोगिरी करणाऱ्या पुण्यातील ट्रेनी आयएएसची वाशिमला बदली

Jul 09, 2024 11:41 AM IST

IAS Pooja Khedkar transfer : प्रोबेशनवर असताना वरिष्ठ अधिकाऱ्याचं अँटी चेंबर बळकावलं, गाडीवर महाराष्ट्र शासनाची पाटी; पुण्यातील चमकोगिरी करणाऱ्या अधिकारी पूजा खेडकरांची थेट वाशिमला बदली करण्यात आली आहे.

खासगी गाडीवर लाल दिवा, वरिष्ठ अधिकाऱ्याच्या चेंबरवर डल्ला मारून चमकोगीरी करणाऱ्या ट्रेनी आयएएस अधिकाऱ्याची वाशिमला बदली
खासगी गाडीवर लाल दिवा, वरिष्ठ अधिकाऱ्याच्या चेंबरवर डल्ला मारून चमकोगीरी करणाऱ्या ट्रेनी आयएएस अधिकाऱ्याची वाशिमला बदली

IAS Pooja Khedkar transfer : पुणे जिल्हाधिकारी कार्यालयात नियुक्तीस असलेल्या 'प्रोबेशन' कालावधीत महिला आयएएस अधिकाऱ्याकडून नियम धाब्यावर बसविले जात असल्याचा प्रकार उघडकीस आला होता. खासगी 'व्हीआयपी' नंबर असलेल्या ऑडी गाडीला अंबर दिवा लावणाऱ्या व पुणे जिल्हाधिकारी कार्यालयातील एका अधिकाऱ्याच्या अॅण्टी चेंबर बळकवणाऱ्या ट्रेनी आयएसअधिकारी पूजा खेडकर यांच्यावर जिल्हाधिकारी डॉ सुहास दिवसे यांनी अखेर कारवाई केली आहे. त्यांची थेट वाशिम येथे बदली करण्यात आली आहे. जिल्हाधिकाऱ्यांपेक्षाही वानखडे यांचा मोठा रुबाब असल्याने याची चर्चा अधिकाऱ्यांमध्ये रंगली होती.

नुकत्याच आयएएस झालेल्या पूजा खेडकर सध्या प्रोबेशनवर आहेत. त्यांना सनदी सेवेसाठी महाराष्ट्र केडर देण्यात आले आहे. सध्या त्यांची नियुक्ती ही पुणे जिल्हाधिकारी कार्यालयात करण्यात आली आहे. परिवाक्षाधिन सहायक जिल्हाधिकारी म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आली होती. दरम्यान, त्यांनी त्यांच्या खासगी ऑडी गाडीवर 'महाराष्ट्र शासन' असा बोर्ड लिहिला असून ही गाडी सरकारी असल्याचं त्यांनी भासवलं. अशी आलिशान महागडी गाडी कोणत्याच शासकीय अधिकाऱ्याची नाही. व खासगी गाडीवर अंबर दिवा लावणे चुकीचे असतांना देखील प्रोबेशनरी आयएएस अधिकारी खेडकर यांनी गाडीवर अंबर दिवा लावला होता. तसेच जिल्हाधिकाऱ्यांच्या गाडीपेक्षाही त्याची गाडी भारी असल्याने त्या जिल्हाधिकाऱ्यांच्या गाडीशेजारीच गाडी लावत असल्याने हे 'मोठे' अधिकारी कोण? याची चर्चा जिल्हाधिकारी कार्यालयात रंगली होती. आयएएसपदी निवड झालेल्या अधिकाऱ्यांना दोन वर्षे शिकण्यासाठी विविध पर्दावर सहा महिन्यांसाठी प्रोबेशनरी पदांवर नियुक्ती दिली जाते. प्रोबेशनरी अधिकाऱ्यासाठी वाहन सुविधा नसते तसेच त्यांनांन स्वतंत्र कार्यालयदेखील नसते. मात्र, खेडकर यांनी जिल्हाधिकारी कार्यालयातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याच्या अॅण्टी चेंबरमध्ये स्वतः चे कार्यालय सुरू केले तसेच त्या ठिकाणी त्यांच्या नावाची पाटीही लावली होती.

या प्रकरणी चर्चा सुरू असतांना पुण्याचे जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे यांनी मुख्य अप्पर सचिवांकडे पत्र लिहित खेडेकर यांच्या विरोधात अहवाल सादर केला आहे. यात त्यांनी वरिष्ठ अधिकाऱ्याचे अँटी चेंबर बळकावल्यापासून ते खासगी गाडीवर अंबर दिवा व महाराष्ट्र शासन लिहिले असल्याचे उल्लेख करत खेडकर यांची प्रशिक्षणासाठी दुसऱ्या जिल्ह्यात नियुक्ती करावी अशी मागणी केली. तसेच त्यांच्या वडिलांची वर्तवणूक चुकीची असल्याचे देखील त्यांनी म्हटले असून या अहवालात व्हॉट्सअप चॅटचे फोटोदेखील जोडले आहेत. त्यानुसार ट्रेनी आयएएस अधिकारी पूजा खेडेकर यांची वाशिममध्ये बदली करण्यात आली आहे.

कोण आहेत डॉ. पुजा खेडकर?

पुजा खेडेकर या २०२३ च्या बॅचच्या आयएएस (IAS) अधिकारी आहेत. त्यांची पुणे जिल्हाधिकारी कार्यालयात जून महिन्यात प्रशिक्षणार्थी म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. मात्र, त्यांनी नियुक्तीपासूनच अधिकाऱ्यांकडे विविध मागण्या सुरू केल्या. पूजा या अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी येथील माजी सनदी अधिकारी दिलीप खेडकर यांच्या कन्या असून त्याचे आजोबा जगन्नाथराव बुधवंत हे देखील आयएएस अधिकारी राहिले आहेत. त्यांचे वडील दिलीप खेडकर हे प्रदूषण विभागाचे आयुक्त होते. त्यांनी वंचित बहुजन आघाडीच्या तिकिटावर अहमदनगर दक्षिण मतदार संघातून लोकसभा निवडणूक लढली. त्यांची आई देखील भालगावच्या सरपंच आहेत.

Whats_app_banner
विभाग
महाराष्ट्रातील बातम्या, प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर