Pune Rain Update : पुण्यात गुरुवारी मुळसाधार पावसाने हजेरी लावली. या पावसामुळे पुण्यात काही भागात मोठ्या प्रमाणात पुरस्थिती निर्माण झाली होती. सिंहगड परिसरात एकता नगर परिसरात काही सोसायट्यांमध्ये पाणी घुसले होते. यामुळे या ठिकाणी बचाव कार्य राबवण्यात आले होते. दरम्यान, आज पुण्यात पावसाचा जोर कमी झाला आहे. सकाळ पासून पावसाने विश्रांती घेतली आहे. तर खडकवासला धरणातून देखली विसर्ग कमी करण्यात आला आहे. आज सकाळी धरणातून १३ हजार ४१६ क्युसेकने विसर्ग सुरू आहे. आज पाऊस कमी झाला असला तरी पुरग्रस्थांचे हाल सुरूच आहे. या परिसरात गेल्या २४ तासांपासून पाणी आणि वीज नअसल्याने नागरिकांचे हाल झाले आहे. तर काही घरात पाणी घुसल्याने त्याचे मोठे नुकसान झाले आहे.
गुरुवारी पुण्याला मुसळधार पावसाने झोडपले. आज पावसाचा जोर ओसरला आहे. खडकवासला धरणातून विसर्ग कमी करण्यात आला आहे. सिंहगड रोड, एकतानगर परिसरातील पाणी देखली ओसरू लागले आहेत. यामुळे येथील पूरस्थिती देखील नियंत्रणात आली आहे. येथील पाणी ओसरले आहे. मात्र, पाण्यामुळे येथील राहिवाशांचे मोठे नुकसान हेल आहे. दुकांनामध्ये पाणी शिरल्याने व्यापाऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे.
पुण्यात काल एकतानगर, सिंहगड रोड, संगम परिसर, शिवाजीनगर, हॅरीस ब्रिज शांतीनगर झोपडपट्टी, दांडेकर पूल दत्तवाडी आणि विश्रांतवाडी येथे अनेक घरात पावसाचे पाणी शिरले होते. अग्निशामक दल आणि एनडीआरएफच्या पथकाने या ठिकाणी बचाव कार्य राबवले. येथील नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले आहे. आज पाणी ओसारल्याने काही नागरिक घरी परतले आहे. पाण्यात वाहून गेलेल्या संसारांमुळे ते हतबल झाले आहेत.
सिंहगड परिसरात झालेल्या पावसामुळे नागरिकांचे हाल झाले. येथील एकता नगर परिसरात गेल्या २४ तासांपासून वीज गायब आहे. तर पाणी पुरवठा देखील बंद करण्यात आला आहे. येथे असलेल्या लोकांना पाणी देण्यात आलेले नाही. नागरिकांना वापरण्यासाठी पाणी नाही. काही नागरिक घरी परतले असून घरातील संसरोपयोगी वस्तु पाण्यात भिजून खराब झाल्या आहेत. त्यामुळे हे नागरिक हतबल झाले असून प्रशासनाकडून मदतीची अपेक्षा त्यांनी केली आहे.
खडकवासला धरणाच्या सांडव्यावरून मुठा नदी पात्रामध्ये सुरू असणारा विसर्ग कमी करून सकाळी ७ वाजता १३ हजार ९८१ क्यूसेक करण्यात येत आहे. आवश्यकतेनुसार बदल संभवू शकतो. नागरिकांनी दक्षता बाळगावी. पावसाच्या प्रमाणानुसार व येव्यानूसार विसर्ग पुन्हा कमी/जास्त करण्याची शक्यता आहे.
वीर धरणाची पाणी पातळी ५७९.२३ मीटर झाली आहे. वीर धरणाच्या सांडव्याद्वारे होणार विसर्ग कमी करून तो ४ हजार ६३७ क्यूसेक करण्यात आला आहे. विसर्ग वाढवून ६१ हजार ४८८ क्यूसेक करण्यात येणार आहे.पावसाचे प्रमाण व तीव्रता लक्षात घेता विसर्गामध्ये बदल करण्यात येणार आहे.
मुळशी धरणातून सुरू असलेला १० हजार ७०० क्यूसेक विसर्ग स्थिर आहे. पाऊस वाढल्यास विसर्गात वाढ होऊ शकते. परिसरातील नागरिकांनी खबरदारी बाळगावी-मुळशी धरण प्रमुख बसवराज मुन्नोळी यांनी केले आहे.
संबंधित बातम्या