Pune Girl Viral Video : पुण्यात अपघातांची संख्या वाढली आहे. रोज कुठे ना कुठे अपघात होऊन नागरिकांना जीवाला मुकावे लागत आहे. कात्रज चौकात बसने धडक दिल्याने चाकाखाली आल्याने तरुणीचा मृत्यू घटना ताजी असतांना, पुण्यात केवळ रिल्स तयार करण्यासाठी जिवावर उदार होऊन जीवघेणे स्टंट करणाऱ्यांचे प्रमाण देखील वाढले आहे. अशीच एक घटना पुण्यातील हडपसर येथे उघडकीस आली आहे. या ठिकाणी एका तरुणीने रिल्स तयार करण्यासाठी 'आखो मे बसे हो तुम...तूम्हे दिल मे बसा लुंगी' या गाण्यावर भरधाव वेगात एका हाताने बाइक चालवून तसेच बाइकवर एका बाजूने बसून रिल्सचा व्हिडिओ तयार केला असून हा व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल झाला आहे. आता या तरुणीवर पोलिस काय कारवाई करणार असा प्रश्न नागरिक विचारत आहेत.
तरुणाईला रिल्सचे वेड लागले आहे. या रिल्सच्या नादात अनेक अपघात झाले असतांना देखील जीवघेणे स्टंट करून इतरांचा देखील जीव देखील ही तरुणाई धोक्यात घालत आहे.
हडपसर येथील एका तारुणीने हात सोडून बाईक चालवत स्टंट केला आहे. हा व्हिडिओ तिने सोशल मिडियावर उपलोड केला आहे. ही तरुणी यामाहा गाडी चालवत असून तिने हात सोडले आहे. ऐवढेच नाही तर ती दोन्ही पाय बाइकच्या एका बाजूला टाकून बसली आहे. गाडीचा वेग जास्त आहे. तसेच समोरून भरधाव वाहने येत असतांना देखील जिवावर उदार होऊन गाण्याच्या लालावर हात सोडून गाडीवर ही तरुणी डान्स देखील करत आहे. आखो मी बसे हो तुमे दिल मी छुपा लुंगा या गाण्यावर तरुणीने हा जीवघेणा रिल्स तयार केला आहे. या पूर्वी पिंपरीत देखील चालत्या कारवर बसून स्टंट करण्याचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. याप्रकरणी संबंधित मुलाला पोलिसांनी चांगलाच हिसका दाखवत गुन्हा दाखल केला होता. तसेच त्याला शिक्षा देखील सुनावली होती. दरम्यान आता हडपसर येथील या या तरुणीचा जीवघेणा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. त्यामुळे तिच्यावर कारवाई होणार का असा सवाल नागरिकांनी उपस्थित केला आहे.
पुण्यात गेल्या काही दिवसांपासून अपघातांचे सत्र वाढले आहे. यात तरुण तरुणींची काहीही चूक नसताना त्यांना जीव गमावावा लागला आहे. पोर्शे अपघातानंतर देखील या घटना कमी झालेल्या नाही. अशा अनेक घटना पुण्यात आणि पिंपरी चिंचवड येथे होऊ लागल्या आहेत. पुणे पोलिसांच्या कारवाईला झुगारून तरुण तरुणी रात्री आपरात्री बाईकवरून फिरत वाहतूक नियमांची पायमल्ली करत आहेत. रस्त्यावर भरधाव वेगात वेडीवाकडी वाहने चालवून स्वतः बरोबरच इतरांचा जीव धोक्यात घालला जात आहे. त्यामुळे तरुण तरुणींनी अशा जीवघेण्या स्टंट पासून दूर राहावे व वाहतूक नियम पाळून वाहने चालवावे असे आवाहन नागरिकांनी केले आहे.
संबंधित बातम्या