hadapsar murder : पुण्यात कौटुंबिक वादातून पतीने महिलेला भोसकले; सहा वर्षांच्या मुलाला घेऊन आरोपी पसार
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  hadapsar murder : पुण्यात कौटुंबिक वादातून पतीने महिलेला भोसकले; सहा वर्षांच्या मुलाला घेऊन आरोपी पसार

hadapsar murder : पुण्यात कौटुंबिक वादातून पतीने महिलेला भोसकले; सहा वर्षांच्या मुलाला घेऊन आरोपी पसार

Published Oct 07, 2024 06:34 AM IST

Pune hadapsar murder : पुण्यात हडपसर येथे कौटुंबिक वादातून महिलेचा तिच्या पतीने खून केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.

पुण्यात कौटुंबिक वादातून महिलेला पतीने भोसकले; सहा वर्षांच्या मुलाला घेऊन आरोपी पती पसार
पुण्यात कौटुंबिक वादातून महिलेला पतीने भोसकले; सहा वर्षांच्या मुलाला घेऊन आरोपी पती पसार

Pune hadapsar murder : पुण्यात गुन्हेगारी प्रवृत्ती मोठ्या प्रमाणात वाढत चालली आहे. किरकोळ कारणावरून हत्या सारख्या घटना रोज घडत आहेत. पुण्यातील हडपसर येथील शिंदे वस्ती परिसरात अशीच एक घटना उघडकीस आली आहे. कौटुंबिक वादातून एका महिलेला तिच्या पतीने खून केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. पोलिसांनी या प्रकरणी पतीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. या नंतर पतीने त्याच्या ६ वर्षांच्या मुलाला घेऊन पळ काढला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरती देबीलाल सरेन (वय ३२, सध्या रा. शिंदे वस्ती, हडपसर) असे हत्या झालेल्या महिलेचे नाव आहे. तर पती देबीलाल लक्ष्मणचंद्र सरेन (वय ४०) असे आरोपीचे नाव असून त्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत दत्तात्रय शंकर चौधरी (वय ५५, रा. तुकाई दर्शन, हडपसर) यांनी हडपसर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून पोलिस आरोपीचा शोध घेत आहेत.

काय आहे घटना ?

सरेन दाम्पत्य हे मूळचे पश्चिम बंगालमधील आहे. ते कामगार असून हडपसर परिसरातील शिंदे वस्ती येथे दत्तात्रय चौधरी यांच्या चाळीत राहतात. आरोपी देबीलाल व त्याची पत्नी दोघेही मजूरी करत असून त्यांना ६ वर्षांच्या मुलगा आहे. सरेन पती पत्नीमध्ये गेल्या काही दिवसांपासून कौटुंबिक कारणावरुन भांडण होत होते. शुक्रवारी मध्यरात्री देखील त्याच्यात मोठा वाद झाला. त्यांच्या भांडणाचा आवाज शेजाऱ्यांनी ऐकला. यावेळी देबीलालने पत्नी आरतीचे डोके भिंतीवर आपटले. तसेच तिच्या डोक्यात घरातील कठीण वस्तूने मारहाण केली. या घटनेत आरतीचा जागीच मृत्यू झाला. यानंतर आरोपीने सकाळी त्याच्या ६ वर्षांचा मुलाला घेऊन तो पसार झाला.

शनिवारी सकाळी सरेन यांच्या खोलीचा दरवाजा उघडा असल्याचे शेजाऱ्यांनी पाहिले. तसेच आरती ही त्यांना रक्ताच्या थारोळ्यात पडल्याचे दिसले. यावेळी शेजऱ्यांनी याची माहिती खोली मालक चौधरी यांना दिली. यानंतर सहायक पोलीस निरीक्षक विलास सुतार यांनी घटनास्थळी पथकासह भेट दिली. त्यांनी पंचनामा केला असून यानंतर फरार आरोपीचा शोध घेण्यासाठी त्यांनी पथकांची स्थापना केली आहे.

Whats_app_banner

संबंधित बातम्या

विभाग
महाराष्ट्रातील बातम्या, प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर