Pune Hadapsar girl suicide : आजकालची मुले सोशल मिडियाच्या आहारी गेली आहे. यामुळे त्यांची सहनशिलता देखील कमी होऊ लागली आहे. यातून किरकोळ कारणावरून टोकाचा निर्णय घेऊन आत्महत्या होत असल्याच्या घटना उघडकीस येत आहेत. अशीच एक घटना पुण्यात बुधवारी उघडकीस आली. आईने रागवल्याने एका मुलीने १३ मजल्यावरून उडी मारून जीवन संपवल्यानं खळबळ उडाली आहे. या छोट्या कारणामुळे मुलीने आत्महत्या केल्याने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार ही घटना पुण्यातील हडपसर येथील उच्चभ्रू असलेल्या अमानोरा टाउनशिप परिसरात बुधवारी दुपारच्या सुमारास घडली. या घटनेत १४ वर्षीय मुलीचा मृत्यू झाला आहे. हडपसर पोलिसांनी या प्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. या घटनेचे वृत्त असे की, बुधवारी दुपारी, अल्पवयीन मुलगी, तिची आई, ८ वर्षांचा मुलगा व तिचा मावसभाऊ बुधवारी दुपारी घरी होते. आईने मुलीला दुपारी २:३० च्या सुमारास मुलीला अभ्यासाला जा असे सांगितले.
मात्र, आईने अभ्यासावरून रागवल्याचा मुलीला राग आला. याच रागातून मुलीने टोकाचा निर्णय घेत इमारतीच्या रिकाम्या जागेतून खली उडली मारली. या घटनेत गंभीर जखमी झाल्याने तिचा जागीच मृत्यू झाला. कुटुंबीयांनी तिला दवाखान्यात दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी तिचा मृत्यू झाल्याचे घोषित केले. या घटनेची माहिती मिळताच हडपसर पोलिस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी घटनास्थळाचा पंचनामा केला. या घटनेमुळे खळबळ उडाली असून शेजारी राहणाऱ्या रहिवाशांनी हळहळ व्यक्त केली.
मोबाइलमुळे आजची मुले ही सोशल मिडियाच्या आहारी गेले आहेत. फोन न दिल्यास मुले हिंसक होऊ लागली आहे. तसेच त्यांच्या वागण्यात देखील मोठ्या प्रमाणात बदल होऊ लागले आहेत. किरकोळ कारणावरून ही मुले टोकाचे पाऊल उचलत आहेत. या मुलांना पालक, शिक्षक कोणाचाही वचक उरला नसल्याचे या घटना वाढल्या आहेत. या घटना कमी करण्यासाठी मुलांकडे लक्ष देण्याची गरज आज निर्माण झाली आहे.
संबंधित बातम्या