मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  ashadhi wari 2024 : पालखी सोहळ्यासाठी पुणे सज्ज! पाच हजार पोलीसांचा चोख बंदोबस्त; सीसीटीव्हीद्वारे पोलिस ठेवणार लक्ष

ashadhi wari 2024 : पालखी सोहळ्यासाठी पुणे सज्ज! पाच हजार पोलीसांचा चोख बंदोबस्त; सीसीटीव्हीद्वारे पोलिस ठेवणार लक्ष

Jun 28, 2024 02:04 PM IST

Ashadhi wari 2024 : आषाढी वारी पालखी सोहळ्याला आज पासून सुरूवात होत आहे. आज तुकोबांचा सोहळा पंढरपूरसाठी मार्गस्थ होणार आहे. तर उद्या संत ज्ञानेश्वर महाराजांचा सोहळा पंढरपूरसाठी मार्गस्थ होणार आहे. या सोहळ्यानिमित्त पुण्यात चोख बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे.

पालखी सोहळ्यासाठी पुणे सज्ज! पाच हजार पोलीसांचा चोख बंदोबस्त; सीसीटीव्हीद्वारे पोलिस ठेवणार लक्ष
पालखी सोहळ्यासाठी पुणे सज्ज! पाच हजार पोलीसांचा चोख बंदोबस्त; सीसीटीव्हीद्वारे पोलिस ठेवणार लक्ष

Ashadhi wari 2024 : आषाढी वारी पालखी सोहळ्याला आज पासून सुरूवात होत आहे. आज तुकोबांचा सोहळा पंढरपूरसाठी मार्गस्थ होणार आहे. तर उद्या संत ज्ञानेश्वर महाराजांचा सोहळा पंढरपूरसाठी मार्गस्थ होणार आहे. या दोन्ही पालख्यांचे आगमन पुण्यात रविवारी होणार आहे. या दोन्ही पालख्यांसोबत मोठ्या प्रमाणात वारकरी देखील दाखल होणार आहे. या सोहळा शांततेत पार पडावा यासाठी punए पोलिसांनी तब्बल पाच हजार पोलिसांचा बंदोबस्त तैनात केला आहे. या सोहल्यावर सीसीटीव्हीला नजर ठेवली जाणार असून यासाठी वॉच टॉवर देखील शहरात उभे केले जाणार आहे.

ट्रेंडिंग न्यूज

श्री क्षेत्र देहू येथून जगद्गुरू श्री तुकाराम महाराज यांच्या पालखी सोहळ्याचे आज प्रस्थान होणार आहे. तर संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखी सोहळ्याचे प्रस्थान उद्या शनिवारी (दि २९) होणार आहे. या दोन्ही पालख्या रविवारी (दि ३०) पुण्यात मुक्कामी दाखल होणार आहे. सोमवारी पालख्यांचा मुक्काम नाना- भवानी पेठेत राहणार आहे. तर यानंतर हा सोहळा मंगळवारी (२५ जून) पंढरपूरकडे प्रस्थान करणार आहे. श्री तुकाराम महाराज यांच्या पालखीचा मुक्काम नाना पेठेतील श्री निवडुंग्या विठोबा मंदिरात राहणार आहे. श्री संत ज्ञानेश्वर यांच्या पालखीचा मुक्काम भवानी पेठेतील श्री पालखी विठोबा मंदिरात राहणार आहे. या सोहळ्यासाठी पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली बंदोबस्ताची तयारी करण्यात आली आहे.

या साठी दोन अतिरिक्त पोलीस आयुक्त, १० पोलीस उपायुक्त, २० सहायक पोलीस आयुक्त, १०१ पोलीस निरीक्षक ३४३ सहायक निरीक्षक, उपनिरीक्षक, तर ३६९३ पोलीस कर्मचारी, ८०० गृहरक्ष दलाचे जवान, राज्य राखीव पोलीस दलाच्या तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत.

सीसीटीव्हीच्या माध्यमातून सोहळ्यावर राहणार लक्ष

पालखी सोहळ्यावर सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या माध्यमातून लक्ष ठेवले जाणार आहे. पालखी सोहळ्यातील गर्दीचे नियोजन पोलिस करणार आहे. या साठी पुण्यात पाच हजार पोलीस तैनात राहणार आहेत. चौकाचौकात निरीक्षण मनोरे उभे केले जाणार आहे. तर वाहतुकीत देखील बदल करण्यात येणार आहे.

WhatsApp channel
विभाग