लाठ्या-काठ्या अन् तुफान दगडफेक.. पुण्यात गणेश विसर्जन मिरवणुकीदरम्यान दोन गटांत तुंबळ हाणामारी, VIDEO
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  लाठ्या-काठ्या अन् तुफान दगडफेक.. पुण्यात गणेश विसर्जन मिरवणुकीदरम्यान दोन गटांत तुंबळ हाणामारी, VIDEO

लाठ्या-काठ्या अन् तुफान दगडफेक.. पुण्यात गणेश विसर्जन मिरवणुकीदरम्यान दोन गटांत तुंबळ हाणामारी, VIDEO

Updated Sep 29, 2023 04:40 PM IST

Pune ganesh visarjan 2023 : गणेश विसर्जन मिरवणुकीदरम्यान दोन गटामध्ये वाद झाला. वादाचे रुपांतर नंतर हाणामारीत झाले.

पुण्यात दोन गटात तुफान राडा
पुण्यात दोन गटात तुफान राडा

अनंत चतुदर्शीनिमित्त पुण्यातील मानाच्या गणपतींसह घरगुती गणेशांचे मोठ्या जल्लोषी वातावरणात विसर्जन पार पडला. मात्रपुण्यातील सहकार नगर भागात गणेश विसर्जन मिरवणुकी दरम्यान दोन गटांत राडा झाल्याची घटना समोर आली आहे. किरकोळ कारणावरून दोन गटात वाद झावा व त्याचे पर्यावसान तुंबळ हाणामारीत झाले. लाठ्या काठ्यांनी दोन गटांनी एकमेकांवर तुफान हल्ला केला. भर रस्त्यावरच दोन गटांमध्ये काठ्यांनी हाणामारी झाल्याने नागरिकांची पळापळ झाली. यामुळे परिसरात काही वेळ भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.

गणेश विसर्जन मिरवणुकीदरम्यान दोन गटामध्ये वाद झाला. वादाचे रुपांतर नंतर हाणामारीत झाले. ही घटना पुण्यातील सहकारनगर परिसरात घडली आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

यावेळी तरुणांच्या घोळक्याने रस्त्यावर उभे राहून एकमेकांवर दगडफेकही केली. ही हाणामारी पाहूनरस्त्यावरून येणाऱ्या जाणाऱ्यांमध्ये दहशतीचे वातावरण पसरले. या व्हिडिओमध्ये स्पष्ट दिसत आहे की, गणेश विसर्जन मिरवणुकीचा डीजे सुरू असतानाच काही अंतरावर दोन मंडळांच्या कार्यकर्त्यांमध्ये ही तुंबळ हाणामारी सुरू आहे. या घटनेनंतर काही वेळानंतर दोन्ही गट घटनास्थळावरून निघून गेले. त्यानंतर वाद निवळला. दरम्यान कोणतरी ही घटना मोबाईलवर शूट केली व याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल केला आहे.

Whats_app_banner

संबंधित बातम्या

विभाग
महाराष्ट्रातील बातम्या, प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर