मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Pune Ganesh Festival : लष्कराच्या जवानांची दगडूशेठ चरणी अनोखी सेवा; ३३० जवानांची सामूहिक आरती

Pune Ganesh Festival : लष्कराच्या जवानांची दगडूशेठ चरणी अनोखी सेवा; ३३० जवानांची सामूहिक आरती

Sep 21, 2023 10:24 PM IST

Pune Ganesh Festival : लष्कराच्या दक्षिण मुख्यालयाच्या तब्बल ३३० जवानांनी दगडूशेठ गणपतीला भेट देत सामूहिक आरती केली.

Pune Ganesh Festival
Pune Ganesh Festival

पुणे : भारत माता की जय च्या घोषणा देत सीमेवर २४ तास खडा पहारा देणा-या भारतीय लष्कराच्या सदर्न कमांड मधील ३०० हून अधिक अधिकारी व जवानांनी 'दगडूशेठ' गणपतीची आरती केली. भारतीय लष्कराच्या प्रमुख केंद्रांपैकी एक असलेल्या सदर्न कमांड (दक्षिणी मुख्यालय) मधील ३३० कमांडचे जवान 'दगडूशेठ' गणपती चरणी नतमस्तक झाले.

ट्रेंडिंग न्यूज

Fact Check: इस्त्रोसाठी लॉन्चपॅड बनवणाऱ्यांवर चाय, इडली विकण्याची वेळ? व्हायरल बातमीमागील सत्य समोर

श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट, सुवर्णयुग तरुण मंडळ च्यावतीने ट्रस्टच्या १३१ व्या वर्षी गणेशोत्सवात जवानांचे स्वागत करण्यात आले. यावेळी लेफ्टनंट जनरल ए.के.सिंग, मेजर जनरल, ब्रिगेडियर, कर्नल, मेजर, कॅप्टन, सुभेदार यांसह लष्करातील वरिष्ठ अधिका-यांच्या हस्ते आरती झाली. ट्रस्टचे कोषाध्यक्ष महेश सूर्यवंशी, उपाध्यक्ष सुनील रासने, उत्सव प्रमुख अक्षय गोडसे, सरचिटणीस अमोल केदारी, राजाभाऊ पायमोडे, इंद्रजीत रायकर, माऊली रासने, राजू आखाडे, अमोल चव्हाण आदी उपस्थित होते.

Maharashtra Rains: पुणे आणि ठाणेकरांनो सावधान! पुढील चार तास धो- धो पावसाची शक्यता

पुण्यात असलेल्या २४ मराठा बटालियन, १५ जाट बटालियन आणि १ महार बटालियन चे जवान व कुटुंबीय यावेळी सहभागी झाले होते. गणपती बाप्पा मोरया... च्या जयघोषाने संपूर्ण परिसर दुमदुमून गेला. यावेळी सदर्न कमांड तर्फे ट्रस्टला सन्मानचिन्ह देखील देण्यात आले.

श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट, सुवर्णयुग तरुण मंडळ च्यावतीने ट्रस्टच्या १३१ व्या वर्षी गणेशोत्सवात भारतीय लष्कराच्या सदर्न कमांड मधील ३०० हून अधिक अधिकारी व जवानांनी 'दगडूशेठ' गणपतीची आरती केली. भारतीय लष्कराच्या प्रमुख केंद्रांपैकी एक असलेल्या सदर्न कमांड (दक्षिणी मुख्यालय) मधील ३३० कमांडचे जवान 'दगडूशेठ' गणपती चरणी नतमस्तक झाले.

टी-२० वर्ल्डकप २०२४