Pooja Khedkar's father's poll affidavit : वादाच्या भोवऱ्यात सापडलेल्या माजी प्रशिक्षणार्थी आयएएस पूजा खेडकर यांचे वडील दिलीप खेडकर पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. आगामी विधानसभा निवडणुकीसाठी त्यांनी अहमदनगर दक्षिण मतदारसंघातून अपक्ष उमेदवार म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. त्यांनी आपल्या उमेदवारी अर्जात आपण घटस्फोटित असल्याचं नमूद केले आहे. तर २०२४ च्या लोकसभा निवडणुकीच्या वेळी दाखल केलेल्या उमेदवारी अर्जात त्यांनी मनोरमा खेडकर यांच्याशी लग्न झाल्याचे नमूद केलं होतं.
ट्रेनी आयएएस अधिकारी पूजा खेडकर यांनी खोटे अपंग प्रमाण पत्र दाखल केल्याने तसेच ट्रेनी असतांना देखील पुणे जिल्हयाधिकारी कार्यालयात आलीशान ऑडी कारवर लाल दिवा लावल्याने त्यांच्यावर केंद्रीय लोकसेवा आयोगाने कारवाई करत त्यांना आयएएस सेवेतून बडतर्फ केलं होतं. यामुळे त्या चर्चेत आला होत्या. दरम्यान, लोकसभा निवडणुकीच्या वेळी देखील त्यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला होता. या उमेदवारी अर्जात माहिती देतांना दिलीप खेडकर यांनी मनोरमा खेडकर यांच्यासमवेत अनेक संयुक्त मालमत्तांचा तपशीलही दिला होता. दिलीप खेडकर आणि मनोरमा खेडकर यांनी २००९ मध्ये परस्पर संमतीने पुण्यातील कौटुंबिक न्यायालयात घटस्फोटासाठी अर्ज केला होता. जून २०१० मध्ये न्यायालयाने त्यांचा घटस्फोट मान्य केला होता.
मिळालेल्या माहितीनुसार, घटस्फोटानंतरही दोघेही एकाच बंगल्यात राहत होते. या बंगल्याला मनोरमा खेडकर यांचे नाव देण्यात आले आहे. अर्जात चुकीची माहिती दिल्याच्या आरोपावरून त्यांची मुलगी पूजा खेडकर यांना यूपीएससीने निलंबित केले होते. आई-वडिलांचा घटस्फोट झाला असून ती आईसोबत राहत असल्याने कौटुंबिक उत्पन्न शून्य असल्याचा दावा खेडकर यांनी करत केंद्रीय लोकसेवा आयोगाची फसवणूक केली होती. लोकसभा निवडणुकीत दिलीप खेडकर यांनी ४० कोटींहून अधिक संपत्ती जाहीर केली होती.
पूजा खेडकरवरून झालेल्या वादानंतर तिची आई मनोरमा आणि दिलीप खेडकर यांच्यावरही गुन्हा दाखल करण्यात आला होता. दिलीप खेडकर यांच्यावर आरोप होता की, पुणे जिल्हाधिकारी कार्यालयात प्रशिक्षणादरम्यान दिलीप खेडकर जिल्हाधिकारी कार्यालयात जाऊन मुलगी पूजासाठी स्वतंत्र केबिन असावी या साठी अधिकाऱ्यांवर दबाव आणला होता. तसेच तहसीलदार व इतर कर्मचाऱ्यांना धमकावलयाचा आरोप देखील त्यांच्यावर आहे. या मुळे दिलीप खेडकर यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
तर मनोरमा खेडकर यांच्यावर आर्म्स अॅक्टसह अनेक कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. मनोरमाचा यांचा हातात बंदूक घेऊन शेतकऱ्याची भांडत असल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. यानंतर पोलिसांनी मनोरमा यांना अटक केली. त्यानंतर पुणे न्यायालयाने त्यांची जामिनावर सुटका केली. दिलीप खेडकर हे महाराष्ट्र सरकारच्या प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या संचालक पदावरून निवृत्त झाले असून ते आता राजकारणात नशीब आजमावत आहेत.
संबंधित बातम्या