मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Pune Ganeshotsav 2023 : पुण्यात ड्रोन उडवाल तर जेलमध्ये जाल; गणेशोत्सवामुळे पुढील ११ दिवस बंदी

Pune Ganeshotsav 2023 : पुण्यात ड्रोन उडवाल तर जेलमध्ये जाल; गणेशोत्सवामुळे पुढील ११ दिवस बंदी

Sep 20, 2023 11:10 AM IST

Drone ban in Pune during Ganeshotsav : पुण्यात वैभवी गणेशोत्सवाला सुरुवात झाली आहे. मानाच्या तसेच सर्व गणेश मंडळाच्या गणेशोत्सवाची उत्सात प्रतिष्ठापणा करण्यात आली आहे. सुरक्षेच्या कारणास्तव पुण्यात ११ दिवस ड्रोन उडवण्यावर बंदी घालण्यात आली आहे.

drone _HT
drone _HT

पुणे : पुण्यात वैभवी गणेशोत्सवाला सुरुवात झाली आहे. मानाच्या तसेच सर्व गणेश मंडळाच्या गणेशोत्सवाची उत्सात प्रतिष्ठापणा करण्यात आली आहे. आज पुण्यात दीड दिवसांच्या गणपतीचे विसर्जन होणार आहे. दरम्यान, पुण्यात चोख सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली असून पुढील ११ दिवस शहरात ड्रोन आणि इतर उडणाऱ्या वस्तू उडवण्यावर बंदी घालण्यात आली आहे. पुणे पोलिसांनी तसे आदेश जारी केले असून याचा भंग केल्यास थेट जेलची हवा खावी लागणार आहे.

Pune Ganeshotsav 2023 : दगडूशेठ' बाप्पांसमोर ३६ हजार महिलांनी केले सामूहिक अथर्वशीर्षाचे पठण

पुण्यात गणेश उत्सवाच्या पार्श्वभूमीवर तब्बल ७ हजार पोलिसांचा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. पोलीस उपायुक्त (विशेष शाखा) यांनी ड्रोन उडवण्या संदर्भात बंदीचे आदेश दिले आहेत. त्यांनी दिलेल्या आदेशानुसार पुण्य पुढील ११ दिवस ड्रोन, रिमोट कंट्रोल, मायक्रो-लाइट, एअरक्राफ्ट, पॅराग्लायडर, पॅरामोटर, हँडग्लायडर, हॉट एअर बलून इत्यादींचा वापर करण्यास बंदी घालण्यात आली आहे. या माध्यमांचा वापर दहशतवाद्यांकडून दहशतवादी कारवायांसाठी केला जाऊ शकतो तसेच नागरिक आणि महत्वाच्या नागरिकांच्या सुरक्षेवर देखील समस्या निर्माण होऊ शकते.

Samruddhi Highway accident : गौरी-गणपतीसाठी गावी जाणाऱ्या कुटुंबावर काळाचा घाला; समृद्धी हायवेवरील अपघातात १ ठार, ३ जखमी

यामुळे २९ सप्टेंबर पर्यंत ड्रोन उडवण्यावर बंदी घालण्यात आली आहे. फक्त शहर पोलीस पाळत ठेवण्यासाठी वापरत असलेल्या ड्रोन आणि उडत्या वस्तूंना या आदेशातून वगळण्यात आले आहे. या आदेशाचे उल्लंघन केल्यास थेट कारवाई केली जाणार आहे. भारतीय दंड संहिता (IPC) च्या कलम १८८ नुसार शिक्षा करण्यात येणार आहे, स्टेशन आणि इतर आस्थापनांना अधिकृत आदेश देण्यास सूचित करण्यात आले आहे. काही दिवसांपूर्वी पुण्यात दोन दहशतवादी सापडले होते.

ट्रेंडिंग न्यूज

त्यामुळे पुणे पोलिस अलर्ट मोड वर आहेत. उत्सव काळात गर्दीवर लक्ष ठेवण्यासाठी १ हजार ८०० सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले आहे. या सोबतच पोलिसांनी मंडळांच्या कार्यकर्त्यांना मंडप परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याचे सांगितले आहे.

WhatsApp channel
महाराष्ट्रातील बातम्या, प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर