Pune sinhagad Firing : अभिनेता सलमान खान यांच्या घरावर गोळीबार झाल्यानंतर पुण्यातील गुंडांची झाडझडती घेण्यात आली होती. यानंतर देखील बुधवार सकाळी हडपसर भागातील शेवाळवाडी परिसरात एका व्यावसायिकावर पिस्तुलातून गोळीबार करण्यात आला तर मंगळवारी जंगली महाराज रस्त्यावर झाशीची राणी चौक परिसरात बांधकाम व्यावसायिकावर पिस्तुल रोखून गोळीबार करण्यात आला. या दोन्ही घटना ताज्या असतांना आज सकाळी पहाटे, एकाने माचिस दिली नाही म्हणून त्याच्यावर गोळीबार करण्यात आला. ही घटना पहाटे सिहंगड रस्त्यावरील भुमकर चौकात २.३० च्या सुमारास घडली. या घटनेत एका तरुणाच्या खांद्याला गोळी लागल्याने तो जखमी झाला आहे.
गणेश गायकवाड (रा. वारजे) असे गोळीबारात जखमी झालेल्या तरुणाचे नाव आहे. गोळी त्याच्या खांद्याला लागली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार ही घटना माचिस मागितल्याच्या कारणातून झालेल्या वादामधून घडली आहे. ही घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे. गेल्या ३ दिवसांतील गोलिबाराची ही तिसरी घटना असुन पुण्यात कायदा आणि सुव्यवस्था आहे की नाही असा प्रश्न पडला आहे.
सलमान खानच्याच्या घरावर गोळीबार झाल्यानंतर पुणे पोलिस आयुक्तालायत बेकायदा पिस्तुल बाळगणाऱ्या गुंडांची झाडाझडती घेण्यात आली होती. एवढेच नाहीत तर पाच वर्षात बेकायदा पिस्तूल बाळगल्याप्रकरणी गुन्हे दाखल झालेल्या गुन्हेगारांची देखील चौकशी करण्यात आली. यावेळी गुंडांना ताकीद देखील देण्यात आली होती. मात्र, यानंतर मंगळवारी दुपारी जंगली महाराज रस्त्यावरील झाशीची राणी चौकात एका मोबाइल शोरुमच्या गल्लीत धीरज दिनेशचंद्र अरगडे (वय ३८, रा. खडकी) यांच्यावर काही आरोपींनी पिस्तूल रोखून त्याच्यावर गोळीबार करण्याचा प्रयत्न केला. अरगडे हे बांधकाम व्यावसायिक असून त्यांच्या जंगली महाराज रस्त्यावरील ऑफिससमोर ही घटना घडली.
तर दुसरी घटना हडपसरमधील शेवाळवाडी परिसरात बुधवारी घडली. व्यावसायिक वादातून एकावर पिस्तुलातून गोळीबार करण्यात आला. गोळीबारात जयवंत बापूराव खलाटे (वय ५३) जखमी झाले. सुधीर रामचंद्र शेडगे यांना या प्रकरणी अटक करण्यात आली आहे.
पोलीस आयुक्तालयात पिस्तुल, बंदूक बाळगणे आणि तत्सम गुन्हे दाखल असलेल्या गुन्हेगारांची परेड घेण्यात आली होती. त्यानंतर, देखील या घटना घडत असल्याने पोलिसांच्या कार्यक्षेमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत.
संबंधित बातम्या