Pune Fire Marathi News: पुण्यातील हडपसर येथील वैभव टॉकीजजवळील तीन मजली इमारतीला भीषण आग लागली.या घटनेची माहिती मिळताच अग्निशमनदलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले. आगीवर नियंत्रण मिळवण्यात अग्निशमन दलाच्या जवानांना यश आले असून सुदैवाने, या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. या थरारक घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
पुण्यातील हडपसर येथील वैभव टॉकीजजवळील तीन मजली इमारतीला भीषण आग लागली. ही घटना जुन्या इमारतीत घडली आणि अनेक रहिवासी आत अडकले. या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी नागरिकांना सुखरुप बाहेर काढले. आग पूर्णपणे आटोक्यात आली असून कोणतीही जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही. ही आग नेमके कशामुळे लागली, हे अद्याप समजू शकलेले नाही. मात्र, या आगीच्या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ माजली.