पुणे : पुण्यात कोंढवा बुद्रुक, येवलेवाडी येथे एका कापड तसेच पडद्यांच्या गोडाऊनला आग लागली आहे. ही आग एवढी भीषण आहे की धुराचे लोट हे दूरवरुन दिसत आहेत. ही आग नेमकी कशामुळे लागली हे समजू शकले नाही. दरम्यान, आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी पुणे व पीएमआरडीए अग्निशमन दलाकडून एकुण १२ अग्निशमन वाहने घटनास्थळी रवाना झाले आहे. सध्या आग विझवण्याचे काम सुरू आहे.
कोंढवा बुद्रुक येथील येवलेवाडी येथे एक कापड आणि पडद्याचे गोदाम आहे. या गोडाऊनला आज सकाळी ८ च्या सुमारास आग लागली. ही आग एवढी भीषण आहे की आगीचे लोट हे दूरवरुन दिसत आहेत. घटनास्थळी पुणे महानगर पालिका आणि पीएमआरडीएचे ८ फायर इंजिन आणि ७ वॉटर टँकर घटनास्थळी दाखल झाले असून आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी अग्निशामक दलाचे प्रयत्न सुरू आहेत.
कोंढवा बुद्रुक येवलेवाडी येथे अनेक गोदामे आहेत. या पैकी कापड आणि पडद्यांचे गोडावून असलेल्या एका गोदामाला ही आग लागली. ही आग नेमकी कशामुळे लागली याची माहिती मिळू शकली नाही. पण ही आग शॉर्टसर्किटमुळे लागली असावी असा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे.
संबंधित बातम्या