Viral news : पुण्यात गुन्हेगारी वाढली आहे. कारने जाणाऱ्या एका अभियंत्यावर तब्बल ४० ते ५० जणांच्या टोळक्याने हल्ला केला. या टोळक्यातील काही जणांनी हातात कोयते आणि लाकडी दांडके घेऊन पाठलाग केला. या घटनेचा व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल होतो आहे.
पुण्यात कारने जाणाऱ्या एका अभियंत्याच्या गाडीवर तब्बल ४० ते ५० जणांच्या टोळक्याने हल्ला केला. यातील काही जणांच्या हातामध्ये कोयते, चाकू, तलवारी, लाकडी दांडके होते. या टोळक्याने कार चालक अभियंत्याचा दुचाकीवरून पाठलाग केला. तसेच गाडीवर देखील दगडी मारली. गाडीतील अभियंता व त्याची पत्नी या वेळी घाबरली होती. या घटनेचा व्हिडिओ अभियंत्याने सोशल मिडियावर पोस्ट केला असून तो व्हायरल झाला आहे. या प्रकरणी पौड पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सुसगाव येथे राहणाऱ्या रवी करणानी या अभियंत्याने या प्रकरणी पोलीसांत तक्रार दिली आहे. ही घटना २९ सप्टेंबर रोजी लवळे गाव ते नांदे गाव या रस्त्या दरम्यान घडली. अभियंत्याने हा व्हिडिओ सोशल मिडियावर टाकला असून तो व्हायरल झाला आहे.
रवी हे २९ सप्टेंबर रोजी लवळे ते नांदे रस्त्याने जात होते. यावेळी या रस्त्यावर वेगवेगळ्या ठिकाणी एकूण ४० ते ५० जण हातात लोखंडी रॉड, दगड, कोयते, तलवारी व काठ्या घेऊन रवी यांच्या गाडीवर हल्ला करत होते. तर दोन बाईकवरुन काही गुंडांनी त्यांचा पाठलाग करत होते. तर काहींनी त्यांना गाडी थांबवण्यास सांगून शिवीगाळ देखील केली. मात्र, रवी यांनी गाडी न थांबवता थेट पुण्यात आणली.
दरम्यान, त्यांच्या गाडीतील त्यांची पत्नी या घटनेमुळे घाबरल्या होत्या. दरम्यान, रवी यांनी या प्रकाराची पोलिसांत तक्रार केली असता, स्थानिक तरुण गस्त घालत असल्याचे सांगत पोलिसांनी त्यांची बाजू घेतली. या घटनेमुळे रवी यांच्या कुटुंबीयांना धोका निर्माण झाल्याचे त्यांनी सांगितले. या प्रकरणी पौड पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.