मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Popatrao gawade: राष्ट्रवादीच्या माजी आमदारास धक्का; ५० वर्षांपासूनची सत्ता गेली
माजी आमदार पोपटराव गावडे
माजी आमदार पोपटराव गावडे
05 August 2022, 17:06 ISTNinad Vijayrao Deshmukh
  • Share on Twitter
  • Share on FaceBook
05 August 2022, 17:06 IST
  • Takali Haji Grampanchayat Election Result: राष्ट्रवादी कॉंग्रेसचे शिरूर तालुक्याचे माजी आमदार पोपटराव गावडे यांना ग्रामपंचायत निवडणुकीत मोठा धक्का बसला आहे. तब्बल ५० वर्षांपासून एकहाती सत्ता असलेल्या टाकळी हाजी ग्रामपंचायत निवडणुकीत पराभवाला सामोरे जावे लागले आहे.

Takali Haji Grampanchayat Election Result: पुणे जिल्ह्यात आज ग्रामपंचायत निवडणुकीत अनेक धक्कादायक निकाल लागले. काही दिग्गजांनी आपले गड कायम ठेवले तर काहींना पराभवाचा जबर धक्का बसला आहे. पूर्वीचे राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये असणारे आणि आता भाजपमध्ये असणारे माजी जिल्हा परिषद प्रदीप कंद यांनी त्यांचा गड कायम राखला आहे. तर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे माजी आमदार पोपटराव गावडे यांना मोठा धक्का बसला आहे. गेल्या ५० वर्षांपासून एक हाती सत्ता असलेल्या टाकळी हाजी ग्रामपंचायतीत त्यांना पराभवाचा सामना करावा लागला आहे.

ट्रेंडिंग न्यूज

टाकळी हाजी ग्रामपंचायत निवडणुकीचा आज निकाल लागला. या निवडणुकीत दामूशेठ घोडे आणि जिल्हा परिषदेचे सेवानिवृत्त अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी प्रभाकर गावडे यांच्या नेतृत्वाखाली पॅनलला १७ पैकी १६ जागा मिळाल्या. त्यांनी माजी आमदार पोपटराव गावडे यांच्या पॅनलचा अक्षरशा धुवा उडाला अवघी एक जागा त्यांना मिळाली. ती देखील अवघ्या तीन मतांनी. पुणे जिल्ह्यातील हा सर्वात मोठा धक्कादायक निकाल समजला जात आहे. गेल्या ५० वर्षांपासूण पोपटराव गावडे यांची या गावावर सत्ता होती. टाकळी हाजी ग्रामपंचायत ही शिरूर तालुक्यातील मोठी ग्रामपंचायत आहे. या ठिकाणी प्रसिद्ध रंजण खळगे देखील आहे. गावडे यांचा दारुण पराभव झाल्याने आता त्यांना आत्मपरीक्षण करण्याची वेळ आली आहे. पोपट राव गावडे यांनी याच ग्रामपंचायततीत सदस्य होत त्यांच्या राजकीय कारकिर्दीला सुरुवात केली होती. या नंतर जिल्हा परिषद आणि नंतर थेट आमदार होण्यात या गावची महत्वपूर्ण भूमिका होती. 

निवडून आलेले प्रभाकर गावडे हे प्रशासकीय अधिकारी होते. ते पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून निवृत्त झाले. या नंतर त्यांनी गावाच्या राजकारणात सक्रिय होत या निवडणुकीत सहभाग घेतला आणि विजय मिळवला. 

दसुरीकडे लोणीकंद ग्रामपंचायतवर प्रदीप विद्याधर कंद यांनी त्यांच्या ग्रामपंचायतीवर निर्विवाद वर्चस्व कायम ठेवले आहे. हवेली तालुक्यातील लोणीकंद ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष आणि पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक प्रदीप कंद यांच्या नेतृत्वाखालील सोमेश्वर ग्रामविकास यांनी १७ पैकी १७ जागा जिंकून वर्चस्व कायम राखले आहे. या निवडणुकीत अकरा जागी बिनविरोध निवडणूक झाली होती. उर्वरित सहा जागांच्या निवडणुकीचे निकाल आज जाहीर करण्यात आले या सर्व जागा कंद यांच्या पॅनलला मिळाल्या.

  • Share on Twitter
  • Share on FaceBook

विभाग