Pune Murder News: पुणे येथे विवाहबाह्य संबंधातून गर्भवती राहिलेल्या प्रेयसीचा गर्भपात करताना मृत्यू झाल्याने प्रियकराने तिचा मृतदेह इंद्रायणी नदीत फेकला. त्यावेळी आईचा मृतदेह पाहून तिचे दोन्ही मुले रडायला लागली. यानंतर आरोपी प्रियकराने आपल्या मित्रासह मृत महिलेच्या दोन्ही मुलांनाही नदीत फेकून दिल्याचा प्रकार सोमवारी सकाळी उघडकीस आला.
मिळालेल्या माहितीनुसार, प्रियकर गजेंद्र दगडखैर आणि त्याचा मित्र रविकांत गायकवाड यांना पोलिसांनी बेड्या ठोकल्या. गजेंद्र दगडखैर आणि मृत महिलेचे विवाहबाह्य संबंध होते. काही दिवसाने महिला गर्भवती राहिली. आरोपीने महिलेला गर्भपात करण्यासाठी कळंबोली येथे त्याच्या मित्रासोबत पाठवले. मात्र, ८ जुलैला उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. यानंतर आरोपींनी महिलेचा मृतदेह आणि तिच्या दोन मुलांना ९ जुलै रोजी वराळे येथे नेले आणि महिलेचा मृतदेह इंद्रायणी नदीत फेकून दिला. आईचा मृतदेह पाहून तिचे दोन्ही मुले मोठमोठ्याने रडू लागली. या मुलांमुळे आपण पोलिसांच्या तावडीत सापडू असे त्यांना वाटले. पुढे त्यांनी कशाचाही विचार न दोन्ही मुलांनाही नदीत फेकून दिले.
दुसऱ्या दिवसांपासून आरोपी काही घडलेच नाही, असे वावरू लागले. महिला आणि तिचे दोन्ही मुले बेपत्ता असल्याने तिच्या नातेवाईकांनी जवळच्या पोलीस ठाण्यात संपर्क साधला. पोलिसांनी अधिक तपासणी केली असता बेपत्ता महिलेचे मुख्य आरोपी गजेंद्रसोबत अनेकदा फोनवर बोलणे झाल्याचे निष्पन्न झाले.यानंतर पोलिसांनी गजेंद्रची कसून चौकशी केली. मात्र, तो उडवाउडवीची उत्तरे देत होती. शेवटी पोलिसी खाक्या दाखवण्यात आला अन् त्याने घडला प्रकार कबूल केला. याप्रकरणी पोलिसांनी मुख्य आरोपी आणि त्याच्या मित्राला अटक करून पुढील चौकशीला सुरुवात केली.
पत्नीच्या डोळ्यात वार करून गंभीर जखमी केल्याप्रकरणी फरासखाना पोलिसांनी पतीवर गुन्हा दाखल केला आहे. ही घटना शनिवारी घडल्याने स्थानिक प्रशासनाने आरोपी कमल शेख याला पकडण्यासाठी कारवाई केली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बुधवार पेठेतील सागर अपार्टमेंटमध्ये कमल आणि त्याची पत्नी रुक्मी यांच्यात झालेल्या वादातून ही घटना घडली.
या निर्घृण हल्ल्यामागचे कारण अद्याप उघड झाले नसून ही घटना नेमकी कशामुळे घडली याचा तपास सुरू आहे. 'आम्हाला शनिवारी मारहाणीचा फोन आला. घटनास्थळी पोहोचल्यावर पीडितेच्या डोळ्याला गंभीर जखम झाल्याचे आढळून आले, अशी माहिती फरासखाना पोलिस ठाण्याच्या तपास अधिकाऱ्याने दिली.
संबंधित कलमान्वये आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून आम्ही आरोपींचा शोध सुरू केला आहे, अशी माहिती या अधिकाऱ्याने नाव न छापण्याच्या अटीवर दिली. पीडितेला तातडीच्या वैद्यकीय उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तिच्यावर उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी तिची प्रकृती चिंताजनक पण स्थिर असल्याचे सांगितले आहे. आरोपीविरुद्ध फरासखाना पोलिस ठाण्यात भारतीय न्याय संहिता कलम १०९ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
संबंधित बातम्या