Pune Dari pool car accident : पुणे-बेंगलूर महामार्ग दरी पुलावर 'बर्निंग कार'चा थरार! व्हिडिओ व्हायरल
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Pune Dari pool car accident : पुणे-बेंगलूर महामार्ग दरी पुलावर 'बर्निंग कार'चा थरार! व्हिडिओ व्हायरल

Pune Dari pool car accident : पुणे-बेंगलूर महामार्ग दरी पुलावर 'बर्निंग कार'चा थरार! व्हिडिओ व्हायरल

Jan 20, 2024 09:15 AM IST

Pune Dari pool burning car accident : पुण्यात नवले ब्रिज ते दरी पूल दरम्यान, अपघातांची मालिका सुरूच आहे. या ठिकाणी दिवसाआड अपघात होत आहे. शुक्रवारी रात्री सुद्धा दरी पुलाजवळ एक कार पेटली.

Pune Dari pool burning car accident
Pune Dari pool burning car accident

Pune Dari pool burning car accident : पुण्यात नवले ब्रिज ते दरी पूल दरम्यान, अपघातांची मालिका सुरूच आहे. या ठिकाणी दिवसाआड अपघात होत आहे. शुक्रवारी रात्री सुद्धा दरी पुलाजवळ एक कार पेटली. गाडीतून धूर येऊन गाडीने अचानक पेट घेतला. सुदैवाने वाहन चलकाला ही बाब लक्षात आल्याने त्याने वेळीच गाडीतून बाहेर पडत आपला जीव वाचवला. याची माहिती अग्निशामक दलाला मिळाल्यावर त्यांनी तातडीने घटनास्थळी जात आगीवर नियंत्रण मिळवले. सुदैवाने या घटनेत जिवत हाणी झाली नाही.

HSC Exam : बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी, ‘या’ दिवसापासून प्रवेशपत्र डाऊनलोड करता येणार

एक व्यक्ति स्वत:ची कार घेऊन ही पुण्याहून कोल्हापूर येथे जात होती. पुण्यातील नवले ब्रिज ओलांडल्यावर काही अंतरावर जांभूळवाडी येथे दरी पूल आहे. या ठिकाणी त्यांची गाडी आली असता, गाडीतून धूर येत असल्याचे चालकाच्या निदर्शनास आले. चालकाने प्रसंगावधान राखत आपले वाहन रस्याच्या कडेला घेऊन अग्निशमन दलास पाचारण केले. दरम्यान, काही वेळातच गाडीने पेट घेतला आणि आगीने उग्र रूप धारण केले.

Maharashtra Weather Update: राज्यात हुडहुडी वाढणार! मध्य महाराष्ट्र, कोकण, विदर्भात तापमानात होणार मोठी घट

पुणे बेंगलूर महामार्गावर दरी पुलावर एका वाहनाने पेट घेतल्याची वर्दि अग्निशमन दल नियंत्रण कक्षात मिळताच दलाकडून सिहंगड रोड अग्निशमन केंद्र येथील अग्निशमन वाहन रवाना करण्यात आले.

घटनास्थळी पोहोचताच जवानानी पाहिले असता एक चारचाकी वाहन पेटलेले दिसले. गाडीमध्ये कुणी नाही याची खात्री करून जवानांनी गाडीवर पाण्याचा मारा सुरू केला व काही वेळात आग आटोक्यात आणली, या घटनेत आगीमध्ये वाहन पुर्ण जळाले असून मोठे नुकसान झाले आहे. या घटनेत जखमी कोणी नाही.

या कामगिरीत सिंहगड अग्निशमन केंद्रातील वाहनचालक विजय साखरे व तांडेल संतोष भिलारे आणि जवान तुषार करे, अमर आटोळे यांनी सहभाग घेतला.

पुणे बंगळूर मार्गावर आपघटच्या घटना या वाढत चालल्या आहे. नवले ब्रिज ते दरी पुला दरम्यान, प्रामुख्याने हे अपघात होत आहे. येथील तीव्र उतार येथील अपघातांना कारणीभूत ठरत आहेत. या मार्गावर होणारे अपघात टाळण्यात यावे या साठी उपाय योजना करण्याची मागणी खासदार सुप्रिया सुळे यांनी केली आहे. दरम्यान, महामार्ग प्राधिकरणाने या परिसराची पाहणी केली असून त्या दृष्टीने उपाय योजना करण्यास सुरुवात केली आहे.

Whats_app_banner
विभाग
महाराष्ट्रातील बातम्या, प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर